घरमहाराष्ट्रअण्णा हजारेंचे उपोषण मागे!

अण्णा हजारेंचे उपोषण मागे!

Subscribe

मंगळवारपासून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसणार होते. परंतु, जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांच्या बैठकीनंतर अण्णा हजारे यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले आहे.

सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे मोदी सरकारच्या विरोधात आजपासून राळेगणसिद्धि येथे उपोषणाला बसणार होते. परंतु, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या भेटीनंतर अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले आहे. लोकपाल, लोकायुक्ताची नियुक्ती इत्यादी मागण्यांसंदर्भात अण्णा उपोषणाला बसणार होते. त्यांनी हे उपोषण मागे घ्यावे यासाठी गिरीश महाजन यांनी आज सकाळीच अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या चर्चांनंतर अण्णा हजारे यांनी पत्रकार परिषद घेऊन उपोषण मागे घेत असल्याचे घोषित केले.

तर पुन्हा उपोषण – अण्णा

गिरीश महाजन यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर अण्णा हजारे यांनी उपोषण स्थगित केले. अण्णा म्हणाले की, ‘आमच्या मागण्यांसाठी सरकारने पाऊल उचलले आहे. यातून आशेचे किरण दिसत असल्यामुळे हे उपोषण स्थगित केले आहे. परंतु, या मागण्या महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीपर्यंत मान्य झाल्या नाहीत, तर पुन्हा उपोषणला बसू’.

- Advertisement -

याआधी रामलीला मैदानावर केले उपोषण

याआधी दिल्लीच्या रामलीला मैदानात मोदी सरकारच्या विरोधात अण्णा हजारे उपोषणाला बसले होते. त्यावेळ त्यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी करावी आणि शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर दीडपट मोबदला मिळावा, वयोवृद्ध शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, अशा मागण्या केल्या होत्या. तसंच अण्णांनी राज्यात लोकायुक्तांची नियुक्ती आणि निवडणूक प्रक्रियेत बदल करण्याची मागणी देखील केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -