घरCORONA UPDATECoronavirus : ठाण्यातही 'कोरोना कंटेनमेंट झोन' जाहीर करा!

Coronavirus : ठाण्यातही ‘कोरोना कंटेनमेंट झोन’ जाहीर करा!

Subscribe

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबईत ज्या ठिकाणी बाधित रुग्ण आढळलेला आहे, अशा ठिकाणापासून आणि परिस्थितीनुरूप ठराविक परिघातील क्षेत्र हे 'कंटेनमेंट झोन' म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मुंबईत ज्या ठिकाणी बाधित रुग्ण आढळलेला आहे, अशा ठिकाणापासून आणि परिस्थितीनुरूप ठराविक परिघातील क्षेत्र हे ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे ठाणे शहरातही मुंबईच्या धर्तीवर कंटेनमेंट झोन जाहीर करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून करण्यात आली आहे. शहरातील विविध भागात दररोज किती रुग्ण सापडतात, तेथील नेमकी परिस्थिती काय आहे, याबाबत अफवा रोखण्यासाठी पालिका प्रशासनाने दैनंदिन मेडिकल बुलेटिन सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करण्याची मागणीही मनसेच्यावतीने करण्यात आली आहे.

मुंबईत ज्या इमारतीमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला आहे, अशी इमारत आणि त्या लगतची इमारत ही परिस्थितीनुरूप ‘बाधित क्षेत्र’ अर्थात ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. अनेक इमारती असणाऱ्या‌ एखाद्या मोठ्या सोसायटीमधील एका इमारतीत बाधित रुग्ण आढळून आला असल्यास संपूर्ण सोसायटी ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून जाहीर करण्याची गरज नाही. तर त्या सोसायटीतील ज्या इमारती मध्ये बाधित रुग्ण आढळून आला असेल, ती इमारत ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून जाहीर करण्याची पद्धती अवलंबण्यात येत आहे. त्याचबरोबर सदर ठिकाणची परिस्थिती लक्षात घेऊन त्या इमारती लगतच्या काही इमारती ह्या ‘कंटेनमेंट झोन’ मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला जात आहे. मात्र ठाण्यात अशा कोणत्याही पद्धतीत कंटेनमेंट झोन तयार केलेले नाही. कोणत्याही भागात कोरोना संशयित रुग्ण आढळल्यास तेथील परिसर देखील सील केला जात नाही. मुंबईत वरळी कोळीवाडा, आदर्श नगर, गोरेगाव येथील बिंबिसार नगर अशाच पद्धतीने २०० हुन अधिक परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले आहेत. मात्र ठाणे पालिकेने अशी कोणतीही पावले न उचलल्याने ज्या भागात रुग्ण आढळून आले आहेत. त्याठिकाणी रहिवाशांसह इतर भागातून आलेल्या नागरिकांचा मुक्तसंचार कायम आहे. त्यामुळे ‘कोरोना’चा फास अधिक घट्ट होण्याची भीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी व्यक्त केली आहे. हे रोखण्यासाठी शहरातील कंटेनमेंट झोन तात्काळ जाहीर करण्याची मागणी महिंद्रकर यांनी केली आहे.

- Advertisement -

अफवांचा बाजार थांबवा

कोणत्याही भागात रुग्णवाहिका येऊन कोरोनाबाधित रुग्ण अथवा त्याच्या कुटुंबाला विलगीकरण कक्षात नेण्यासाठी दाखल होताच काही तासात अफवांचा पूर येतो. आपल्या भागात नेमक्या किती जणांना कोरोना झाला, किती संशयित आहेत अथवा किती रुग्णांनी उपचार घेऊन कोरोनाला हरवले, याबाबत इत्यंभूत माहिती ठाणे पालिकेच्या सोशल मीडियावरून मेडिकल बुलेटिनच्या माध्यमातून द्यावी, असेही महिंद्रकर यांनी पालिका आयुक्त विजय सिंघल यांना पाठवलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -