घरमहाराष्ट्रअंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, उपसभापती नीलम गोर्‍हे यांची घोषणा

अंबादास दानवे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, उपसभापती नीलम गोर्‍हे यांची घोषणा

Subscribe

अंबादास दानवे यांची विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते पदी निवड झाली आहे. याबाबत उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी घोषणा केली आहे.

मुंबई – विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या नावाची मंगळवारी घोषणा करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांसदर्भात दिलेल्या पत्राला विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी मान्यता दिली असून त्यांनी दानवे यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आल्याचे जाहीर केले.

विधान परिषदेत शिवसेनेचे १२, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी १० सदस्य आहेत. विधान परिषदेतील सर्वात मोठा पक्ष म्हणून विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेचा सदस्य नेमावा असे पत्र उपसभापती नीलम गोर्‍हे यांना शिवसेनेकडून देण्यात आले होते. त्यानंतर विरोधी पक्षनेते पदासाठी अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती.

- Advertisement -

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी काल, सोमवारी उद्धव ठाकरे यांच्या शिफारशीचे पत्र नीलम गोर्‍हे यांना सुपूर्द केले होते. त्यानंतर आज गोर्‍हे यांनी विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची निवड करण्यात आल्याचे जाहीर केले. याविषयीचे राजपत्रही रात्री प्रसिद्ध करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -