घरताज्या घडामोडीडोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आठवले नाराज

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आठवले नाराज

Subscribe

ट्रम्प यांनी पराभव स्विकारून बायडेन यांना सहकार्य करावे आठवलेंचा सल्ला

नाशिक । अमेरिकेचे अध्यक्ष, रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी बुधवारी लोकशाहीवर हल्ला चढवला. अमेरिकी संसद भवनात घुसून ट्रम्प समर्थकांनी तोडफोड, हाणामारी केली. मात्र या घटनेने आरपीआय नेते रामदास आठवले ट्रम्प यांच्यावर चांगलेच नाराज झाले आहेत. ट्रम्प यांनी पराभव न स्विकारता जनमताचा अनादर करत रिपब्लिकन पक्षाचा अवमान केला आहे. हा लोकशाहीचा अवमान आहे. त्यांच्यामुळे भारतातही आमची नाचक्की होत आहे त्यामुळे ट्रम्प यांनी पराभव स्विकारून नवनियुक्त अध्यक्ष बायडेन यांना सहकार्य करावे असा असा सल्ला आठवले यांनी नाशिक येथे बोलतांना दिला.

अमेरिकेत संसदेत झालेल्या हिंसाचार प्रकरणी रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलतांना आठवले म्हणाले, माझ्या पक्षाचे म्हणजे अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी तेथील जनमताचा कौल अमान्य करून रिपब्लिकन संकल्पनेचा, लोकशाहीचा अपमान केला आहे. या कृतीमुळे अमेरिकेत लोकशाही धोक्यात आली आहे का असा प्रश्न यामुळे निर्माण होतो. रिपब्लिकन पक्षाने असे वागणे योग्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हा पक्ष स्थापन केला. प्रजासत्ताक म्हणजे लोकांना घेऊन चालणारा पक्ष म्हणून त्यांनी पक्षाला हे नाव दिले. हेच नाव अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षालाही देण्यात आले.

- Advertisement -

त्यामुळे लोकशाहीत बहुमताचा सन्मान करून ट्रम्प यांनी बायडेन यांना पदाची सुत्र सोपवणे आवश्यक होते. ट्रम्प यांनी याउलट कृती करून स्वतःबरोबर आमचीही प्रतिमा मलिन करून घेतली आहे. ट्रम्प यांनी केलेला प्रकार लोकशाहीला मारक आहे. अल्पमतात असतांना बहुमताचा सन्मान केला नाही असे आजवर जगात कोणत्याही देशात घेडले नाही ते ट्रम्प करत आहेत. त्यामुळे आता ट्रम्प यांनी पराभव स्विकारावा आणि नवनियुक्ती अध्यक्ष जो बायडेन यांना सहकार्य करावे. शक्य झाल्यास मी ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा करेन असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -