घरक्रीडाIPL 2022: मुंबईचा सलग पाचवा पराभव; कर्णधार रोहित शर्मासह संपूर्ण संघावर दंडात्मक...

IPL 2022: मुंबईचा सलग पाचवा पराभव; कर्णधार रोहित शर्मासह संपूर्ण संघावर दंडात्मक कारवाई

Subscribe

इंडियन प्रिमीयर लीगचे (आयपीएल) जेतेपद 5 वेळा पटकवणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संगाला 15 व्या पर्वात अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. या पर्वात मुंबईची निराशाजनक कामगिरी होत आहे. काल झालेल्या मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात मुंबईचा पराभव झाला.

इंडियन प्रिमीयर लीगचे (आयपीएल) जेतेपद 5 वेळा पटकवणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संगाला 15 व्या पर्वात अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. या पर्वात मुंबईची निराशाजनक कामगिरी होत आहे. काल झालेल्या मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्यात मुंबईचा पराभव झाला. मुंबईचा हा सलग पाचवा पराभव ठरला आहे. विशेष म्हणजे या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि संघातील इतर खेळाडूंना अजून एक फटका बसला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या लढतीत स्लो ओव्हर रेटमुळं रोहित शर्मासह संपूर्ण संघावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

इंडियन प्रिमीयर लीगच्या ‘कोड ऑफ कंडक्ट’नुसार, स्लो ओव्हर रेटसंबंधीची चूक होण्याची मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामातील ही दुसरी वेळ होती. त्यामुळं कर्णधार रोहित शर्माला २४ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. तर संघातील इतर खेळाडूंवर ६ लाख रुपये किंवा सामन्यातीत मानधनाच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल, एवढा दंड ठोठावण्यात आला आहे. याआधी आयपीएल २०२२मध्ये मुंबईचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झाला होता. त्यावेळीही मुंबई इंडियन्सवर कारवाई करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता.

- Advertisement -

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत पंजाबनं तुफानी खेळी करत मुंबईसमोर मोठं आव्हान ठेवलं होतं. या अव्हानाचा पाठलाग करताना आवश्यक धावगती आवाक्यात आल्यानंतरही मुंबई इंडियन्सनं मोक्याच्या वेळी फलंदाज गमावले. यामुळं पंजाब किंग्जविरुद्ध मुंबईला १२ धावांनी पराभव पत्करावा लागला. विशेष म्हणजे यंदाच्या सत्रातील मुंबईचा हा सलग पाचवा पराभव ठरला.

पंजाबने दिलेल्या १९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना डीवाल्ड ब्रेविसने केवळ २५ चेंडूत ४९ धावांचा चोप देताना मुंबईला पुनरागमन करून दिले. त्याने राहुल चहरच्या एकाच षटकात ४ षटकार ठोकले. तो बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने मुंबईला सावरले. तिलक वर्मा आणि किएरॉन पोलार्ड यांचा सूर्यासोबतचा ताळमेळ चुकल्याने मोक्याच्या वेळी धावबाद होऊन परतले. येथून पंजाबने मिळविलेली पकड अखेरपर्यंत कायम राखली. ओडियन स्मिथने अखेरच्या षटकात ३ बळी घेतले.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2022 : खेळाडूंसोबत फोटो काढण्यासाठी दारूच्या नशेत तोडलं बायोबबल; पोलिसांविरोधातच गुन्हा दाखल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -