घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंना आणखी एक झटका, शिंदे गटातील राहुल शेवाळेंना लोकसभेतील शिवसेना नेते...

उद्धव ठाकरेंना आणखी एक झटका, शिंदे गटातील राहुल शेवाळेंना लोकसभेतील शिवसेना नेते म्हणून मान्यता

Subscribe

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल शेवाळे यांना लोकसभेतील शिवसेना नेते म्हणून मान्यता दिलीय. बाळासाहेब ठाकरे यांचा विचारांवर चालण्यासाठी आमच्या भूमिकेला शिवसेनेच्या खासदारांनीही पाठिंबा दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत

नवी दिल्लीः लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृह नेता बदलण्याची शिवसेनेच्या शिंदे गटाची मागणी मान्य केली आहे. आता सभागृहात शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे असतील, तर भावना गवळी यांना मुख्य प्रतोदपदी कायम ठेवण्यात आले आहे. 12 जानेवारी 1988 रोजी अॅटर्नी जनरलने सर्वोच्च न्यायालयाला दिलेल्या सूचनेचा लोकसभेच्या अध्यक्षांनी संदर्भ देत ज्या पक्षाकडे बहुमत आहे, त्यांचाच नेता होत असल्याचं सांगितलंय.

आपल्या निर्णयात लोकसभा अध्यक्षांनी गेल्या वर्षी जूनमध्ये एलजेपीच्या प्रकरणाचा संदर्भ दिलाय, ज्यामध्ये पक्षाच्या 6 पैकी 5 खासदारांनी पशुपती पारस यांना नेता म्हणून निवडले होते. याआधी मंगळवारी संध्याकाळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावा केला की, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राहुल शेवाळे यांना लोकसभेतील शिवसेना नेते म्हणून मान्यता दिलीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालण्यासाठी आमच्या भूमिकेला शिवसेनेच्या खासदारांनीही पाठिंबा दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत.

- Advertisement -

शिंदे गटाच्या खासदारांनी अध्यक्षांची भेट घेतली

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १२ लोकसभा सदस्यांनी काल लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन कनिष्ठ सभागृहातील त्यांच्या पक्षाचा नेता बदलण्याची विनंती केली. पक्षाचे सभागृह नेते विनायक राऊत यांनी लोकसभेच्या अध्यक्षांना शिंदे गटाचे कोणतेही निवेदन स्वीकारू नये, अशी विनंती करणारे पत्र सादर केल्यानंतर शिवसेनेच्या बंडखोर खासदारांनी ओम बिर्ला यांची भेट घेतली.

काय म्हणाले शिंदे गटाचे खासदार?

शिंदे गटाच्या १२ खासदारांपैकी एक असलेले हेमंत गोडसे म्हणाले, “शिवसेनेच्या १२ लोकसभा सदस्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राहुल शेवाळे यांची भेट घेतली. सभागृहात पक्षाचा नेता म्हणून सोमवारी विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात स्पष्ट केले होते की, ते शिवसेनेच्या संसदीय पक्षाचे गटनेते आहेत आणि राजन विचारे हे मुख्य प्रतोद आहेत.

- Advertisement -

हेही वाचाः फोन टॅपिंग प्रकरण; मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडीकडून अटक

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -