घरताज्या घडामोडीपुण्यात आणखी एक करोना रुग्ण आढळला; पुण्यात एकूण संख्या १७ वर

पुण्यात आणखी एक करोना रुग्ण आढळला; पुण्यात एकूण संख्या १७ वर

Subscribe

परदेशातून आलेल्या नागरिकांनी क्वॉरनटाइनचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, अशी महिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

पुण्यात आणखी एक करोना रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पुण्यात एकूण संख्या १७ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासात एक पॉझिटिव्ह करोना रूग्ण आढळून आला आहे. हा पिंपरी-चिंचवड परिसरातला आहे. १४ मार्च रोजी त्याने अमेरिकेतून प्रवास केला होता. तसेच दुबई मार्गे मुंबईला येऊन मग पुण्यात आला. त्यामुळे आता पुण्यात करोना बाधित रुग्णांची संख्या १७ झाली आहे. तसेच गेल्या २४ तासामध्ये ३२ जणांना डिस्चार्ज दिला आहे. विमानतळावरून जे कोणी येतील, त्यांच्याबाबतीमध्ये पूर्वीचा प्रोटोकॉल फॉलो केला जाईल. त्यामध्ये एक सुधारणा आली आहे की, त्यांना आता २४ तास क्वॉरनटाइनमध्ये टाकले जाईल. २४ तासानंतर संस्थात्मक क्वॉरनटाइनमध्ये ठेवले जाईल. त्यानंतर प्रत्येकाची तपासणी होईल. मग होम क्वॉरनटाइन किंवा इस्टिट्यूशनल क्वॉरनटाइन केले जाईल. ५२० इस्टिट्यूशनल क्वॉरनटाइनची होती, तर आता बालेवाडीमध्ये २५० ची वाढ केली जात आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर विशेष लक्ष दिले जात आहे. जर का परदेशातून आलेल्या नागरिकांनी क्वॉरनटाइनचे उल्लंघन केले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आमच्याकडे काही तक्रारी आणि फोटो येत आहेत. ते आपल्या कुटुंबासोबत आजूबाजूच्या समाजालाही घाबरवत आहेत. असे कोणी आढळून आल्यास त्यांना सर्वप्रथम इस्टिट्यूशनल क्वॉरनटाइनमध्ये आणले जाईल. त्यानंतर त्यांचे एकही कारण ऐकले जाणार नाही, अशी महिती पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील गर्दी टाळण्यासाठी जिल्हाधिकारी आणि वाहतुक विभागाला पत्र लिहिले आहे. यात सर्व वाहतूक परवाने ३१ मार्चपर्यंत इशू होणार नाही. विशेषतः  नवीन परवाने दिले जाणार नाही. तसेच परवान्याची कामे ऑनलाईन करून शकता. त्यामु्ळे आरटीओचे सर्व परवाने आम्ही बंद करत आहोत. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. औषध निरीक्षण पथकाने बनावट १ लाखांचा सॅनिटाझरचा साठा जप्त केला आहे. संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शासनाच्यावतीने पुणे विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी माहिती देतील. तसेच महापालिकेच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी हे त्यांच्या संबंधित विभागामध्ये माहिती पुरवितील, अशी पॉलिसी ठरविण्यात आली आहे. एका पथकाचे गठन करण्यात आले आहे. तसेच पथक कमी पडले तर २८०० होमगार्ड आहेत, त्यांनाही सेवेसाठी रुजू केले जाईल, असे दीपक म्हैसेकर म्हणाले.

- Advertisement -

नवीन आधारकार्ड देण्याचे काम ३१ मार्चपर्यंत थांबविण्यात आले आहे. २१ हजार ५८३ व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यातील पाच जणांना नायडू किंवा भोसरी येथे पाठविण्यात आले आहे. १ लाख १७ हजार ३३६ जणांचे स्क्रीनिंग करण्यात आले आहे. दळणवळणामध्ये गर्दीच्यावेळी गाड्यांची कटोती करण्यात आलेली नाही. ज्या बसेसच्या फेऱ्या सुरू आहेत, त्या तशाच सुरू राहतील. पीएमपीएलच्या २५० बस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासनाने १० कोटीचा निधी दिला होता. त्यातील चार जिल्ह्यांना ४० लाख रूपये सुपूर्द करण्यात आला आहे. तसेच पुणे जिल्ह्यासाठी २ कोटी ४० लाख दिले आहेत. आणखी ६ कोटी रूपये शिल्लक आहेत. तर राज्यांना आवश्यकतेनुसार निधी उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय हाफकिन संस्थेकडून २००० हजार अतिरिक्त एन-९५ मास्क पुरविले जाणार आहे, असेही म्हैसेकर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -