Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर क्राइम परमबीर सिंह यांच्याविरोधात ठाण्यात आणखीन एक गुन्हा दाखल, प्रदीप शर्मांसह ८ जणांचा...

परमबीर सिंह यांच्याविरोधात ठाण्यात आणखीन एक गुन्हा दाखल, प्रदीप शर्मांसह ८ जणांचा समावेश

परमबीर सिंग आणि इतर जणांवर जबरी चोरी, धमकावणे, खंडणी यांसारखे १० हून अधिक कलमाअंतर्गत गुन्हा दाखल

Related Story

- Advertisement -

मुंबई माजी पोलीस आयुक्त यांच्या अडचणी अधिकच वाढत आहेत. परमबीर सिंह यांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने एसआयटीची नेमणूक केली आहे. तर आता ठाणे येथे परमबीर सिंह यांच्याविरोधात आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केतन तन्ना यांच्यासह सोनी जालान आणि रियाज भाटी यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. परमबीस यांच्यासह एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मावरही सहआरोपी असल्याचा गुन्ह्यात नोंद केली आहे. ठाण्यातील कोपरीमध्येही परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर ठाणे नगर पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. परमबीर सिंह यांच्याविरोधात मुंबईतील मरीन ड्राइव पोलीस स्टेशनमध्ये एक तर ठाण्यात दोन असे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परमबीर सिंग आणि इतर जणांवर जबरी चोरी, धमकावणे, खंडणी यांसारखे १० हून अधिक कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तत्कालीन ठाणे खंडणी विरोधी पथक प्रमुख प्रदीप शर्मा,राजकुमार कोथमिरे,एसीपी एन टी कदम, तसेच दोन पोलीस शिपाई यांच्यासह इतर दोघांवर देखील गुन्हा दाखल झाला आहे.

- Advertisement -

परमबीर सिंग यांच्या विरोधात केतन तन्ना यांच्यासह सोनु जलान, रियाज भाटी यांच्या गेल्या ३ दिवसापासून  संघर्ष सुरू होता. अखेर परमबीर सिंह यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे आपल्याला न्याय मिळाला आहे आणि हा न्यायव्यवस्थेचा विजय आहे असे सोनी जालान यांनी म्हटले आहे. विमल अग्रवाल हा केतन तन्नांना बंदूकीचा धाक दाखवून खंडणी मागत होता तर अगरवालची पत्नी केतन तन्नांच्या पत्नीला घाबरवत होती असेही सोनी जालान यांनी म्हटलं आहे.

परमबीर सिंह यांच्याविरोधात एसआयटी नेमणूक

माजी मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात भाईंदरमधील बिल्डर श्याम सुंदर अग्रवाल यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. १५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी परमबीर सिंह यांच्यासह अन्य ५ पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी नेमण्यात आली आहे. तर बिल्डर श्याम सुंदर अग्रवाल यांच्याविरोधात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याचाही तपास हीच एसआयटी टीम करणार आहे.

- Advertisement -