घरमहाराष्ट्रखारघर उष्माघाताचे 14 बळी

खारघर उष्माघाताचे 14 बळी

Subscribe

मुंबई | ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार सोहळा रविवारी खारघर येथे पार पडला. या सोहळ्यासाठी लाखोच्या संख्येने श्रीसदस्यांनी (Shri Sadasya) हजेरील लावली होती. या सोहळ्याची वेळ दुपारीची असल्यामुळे श्रीसदस्यांना भर उन्हात बसावे लागले होते. या सोहळ्याच्या समारोपानंतर काही श्रीसदस्यांना चक्कर येणे आणि उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. यानंतर श्रीसदस्यांना उपचारासाठी खारघर, वाशी, नवी मुंबई आणि नेरुळ येथील रुग्णालयात येण्यात आले.

महाराष्ट्र भूषण दुर्घटनेत आज आणखी एकाचा मृत्यू झाला आह. यामुळे महाराष्ट्र भूषण दुर्घटनेतील बळींचा आकडा १४ वर पोहोचला आहे. या दुर्घटनेत १० महिला तर ४ पुरुष असे एकूण १४ श्रीसदस्य मृत्यूमुखी पडले आहेत. तर ८ व्यक्तींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच ३५ श्रीसदस्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्र भूषण दुर्घटनेत आज एका महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचे नाव स्वाती वैद्य असे असून त्या ३४ वर्षाच्या होत्या. स्वाती वैद्य या विरारमध्ये राहत होत्या. स्वाती वैद्य यांच्यावर वाशीतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. या सोहळ्यादरम्यान चेंगराचेंगरीचा एक व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाडा यांनी ट्वीट केला आहे. “समाज माध्यमां मधून हा वीडियो आला आहे हा मोर्फ नाही कारण महाराष्ट्र शासनाची गाडी दिसते हा चेंगराचेंग्रीचा प्रकार कुठे घडला असावा ?”, असा सवाल जितेंद्र आव्हाडांनी त्यांच्या ट्वीटमधून केला आहे.

- Advertisement -

मृत १४ श्रीसदस्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत

  1.  तुळशिराम भाऊ वागड
  2.  जयश्री जगन्नाथ पाटील
  3.  महेश नारायण गायकर
  4.  कलावती सिध्दराम वायचाळ
  5.  मंजूषा कृष्णा भोंबडे
  6.  भीमा कृष्णा साळवी
  7.  सविता संजय पवार
  8. स्वप्नील सदाशिव केणी
  9.  पुष्पा मदन गायकर
  10. वंदना जगन्नाथ पाटील
  11. मिनाक्षी मोहन मेस्त्री
  12. गुलाब बबन पाटील
  13. विनायक हळदणकर
  14. स्वाती राहुल वैद्य

नेमके काय घडले

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला. हा सोहळा पाहाण्यासाठी जवळपास २० लाख श्रीसदस्य उपस्थित राहिल्याची माहिती मिळाली आहे. या सोहळ्यानंतर काही श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. अतिउष्णतेमुळे काही श्रीसदस्य आजारी पडले. तर उन्हामुळे काही श्रीसदस्यांना चक्कर आली. यानंतर त्या सर्व श्रीसदस्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -