घरमहाराष्ट्रपवार कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचे 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर झळकले

पवार कुटुंबातील आणखी एका व्यक्तीचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर झळकले

Subscribe

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांनी बंड केल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यानंतर अजित पवार हे राज्याचे भावी मुख्यमंत्री असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यात आता अजून एका पवार कुटुंबीयातील व्यक्ती भावी मुख्यमंत्र्यांच्या रांगेत येऊ उभा राहिला आहे. तर दुसरे तिसरे कोणी नसून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार आहेत. रोहित पवार यांचा शुक्रवारी वाढदिवस आहे. रोहित पवारांच्या वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख हा भावी मुख्यमंत्री करण्यात आलेला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आहे आहे.

रोहित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर फ्लेक्स लावले आहे. या फ्लेक्समध्ये रोहित पवार यांच्या समर्थकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केला आहे.

- Advertisement -

यापूर्वी अजित पवार यांच्या वाढदिवसाला अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असे फ्लेक्स लावले होते. यानंतर अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बाजूला करत मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार असल्याचे स्पष्ट केल्यानंतर सर्व चर्चांना पुर्णविराम दिला होता. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाला सुद्धा भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात आले होते आणि आता रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने भावी मुख्यमंत्र्यांचे फ्लेक्स लागले आहेत.

हेही वाचा- अजित पवार गटाकडून आमदारांचे ब्लॅकमेलिंग; रोहित पवार यांचा आरोप

- Advertisement -

रोहित पवारांकडून अजित पवार गटावर ब्लॅकमेलिंगचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदार आणि खासदारांना अजित पवार यांच्या गटात प्रवेश सहभागी व्हावे म्हणून ब्लॅकमेल केले जात आहे, त्रास देण्यात येत आहे. तू प्रतिज्ञापत्रावर सही कर नाहीतर अमुक-अमुक काम होणार नाही असे संबंधित आमदार खासदार यांना सांगितले जात आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार रोहित पवार यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -