Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र महाराष्ट्र भूषण सोहळा.. मृतांचा आकडा १४ वर

महाराष्ट्र भूषण सोहळा.. मृतांचा आकडा १४ वर

Subscribe

मुंबई | ‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेत आज आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) दुर्घटनेतील बळींचा आकडा १४ वर पोहोचला आहे. ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा सोहळा नवी मुंबईतील खारघर येथे रविवारी पार पडला. या सोहळ्यासाठी लाखोच्या संख्येने श्रीसदस्यांनी (Shri Sadasya) हजेरील लावली होती.

या सोहळ्याची वेळ दुपारीची असल्यामुळे श्रीसदस्यांना भर उन्हात बसले होते. या सोहळ्यात अनेक श्रीसदस्यांना चक्कर येणे आणि उष्माघाताचा त्रास जाणवू लागला. यानंतर श्रीसदस्यांना खारघरमधील टाटा रुग्णालय, वाशीतील एमजीएम रुग्णालय, नेरुळ येथील डी. वाय. पाटील रुग्णालय आणि नवी मुंबई महानगर पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या दुर्घटनेत स्वाती वैद्य यांचा आज मृत्यू झाला आहे. स्वाती वैद्य या विरारमध्ये राहणाऱ्या होत्या. स्वाती वैद्य यांचे वय ३४ होते. स्वाती वैद्य यांच्यावर वाशीतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते.

- Advertisement -

या सोहळ्यादरम्यान चेंगराचेंगरी झाल्याचे व्हिडिओ आता समोर आले आहेत. यात उष्माघात आणि गर्दीच्या नियोजना आभावी श्रीसदस्यांना आपले प्राण गमवावे लागल्याचे कळते. या सोहळ्याच्या ठिकाणी प्रचंड गर्दी असल्यामुळे अस्वस्थ श्रीसदस्यांना बाहेर काढणे अवघड झाले होते. या दुर्घटनेत आतापर्यंत १४ श्रीसदस्यांचा बळी गेला आहे.

निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत करा – अजित पवार

- Advertisement -

या दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्र लिहून केली आहे. या पत्रात महाराष्ट्र भूषण सोहळ्यातील दुर्घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत करा. आणि मृतांच्या नातेवाईकांना २० लाख तर बाधितांनावर मोफत उपचारांसह ५ लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणीही अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

नेमके काय घडले

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना प्रदान करण्यात आला. हा सोहळा पाहाण्यासाठी जवळपास २० लाख श्रीसदस्य उपस्थित राहिल्याची माहिती मिळाली आहे. या सोहळ्यानंतर काही श्रीसदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. अतिउष्णतेमुळे काही श्रीसदस्य आजारी पडले. तर उन्हामुळे काही श्रीसदस्यांना चक्कर आली. यानंतर त्या श्रीसदस्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 

- Advertisment -