घरमहाराष्ट्रगुजराती साजात आली, मराठी थाटात रवाना झाली

गुजराती साजात आली, मराठी थाटात रवाना झाली

Subscribe

दुसरी खासगी तेजस एक्स्प्रेस अहमदाबाद -मुंबई अहमदाबाद धावली

देशातील पहिल्या खासगी तेजस एक्स्प्रेसनंतर अहमदाबाद ते मुंबई दरम्यान दुसरी खाजगी तेजस शुक्रवारी सकाळी धावली.या गाडीला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी हिरवा झेंडा दाखवला. मात्र या या गाडीला रेल्वे कर्मचारी संघटनेने तीव्र विरोध केल्यामुळे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या कार्यक्रमाला पाठ फिरवली. सुरूवातीला या एक्स्प्रेसमध्ये गुजराती संस्कृतीचे दर्शन घडणार होते.परंतु, वाद उफाळल्यानंतर आयआरसीटीसीने याची दखल घेतली त्यानंतर गुजराती साज चढवून तेजस मुंबई सेंट्रलला आली आणि मराठी साज चढवून तेजस अहमदाबादला रवाना झाली.

११ ब्राम्हणांच्या हस्ते पूजा

- Advertisement -

आयआरसीटीसी प्रशासनानेही ११ ब्राम्हणांच्या हस्ते मंत्रोपचार करत तेजसची पूजा केली. त्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी तेजसला हिरवा झेंडा दाखवला आणि गाडी मुंबईच्या दिशेने रवाना केली. तेजसच्या पहिल्याच फेरीत गाडीतील ७३६ सीट्स बुक झाल्याने हाऊसफुल्लचा बोर्ड लागला. याशिवाय १९ जानेवारीपासून नियमित सेवेत येणार्‍या तेजसच्या सर्व सीटचे बुकिंग फुल्ल झाल्याची माहिती आयआरसीटीसीने दिली.

तेजसला निरोप मराठीत

- Advertisement -

मुंबई-अहमदाबाद खासगी तेजस चालवायची असेल तर गुजराती संस्कृतीबरोबरच महाराष्ट्राची संस्कृती देखील जपली पाहिजे. अन्यथा आम्ही मुंबईत गाडी येऊ देणार नाही’, असा इशारा मनसेकडून देण्यात आला होता. त्यानंतर आयआरसीटीने यांची दखल घेतली. तातडीने मुंबईहून आजच सायंकाळी सुटणार्‍या तेजसमधील कर्मचार्‍यांच्या डोक्यावर गांधी टोपी घालण्याचा निर्णय घेतला आहे.त्यानंतर मुंबई सेंट्रलवरून परतीच्या प्रवासाला निघालेल्या तेजसमधील कर्मचार्‍यांच्या डोक्यावर गुजराती पेहरावाऐवजी पांढर्‍या रंगाच्या टोप्या दिसल्या. तसेच महाराष्ट्रीयन संस्कृतीचा विसर रेल्वेची खानपान सेवा सांभाळणार्‍या आयआरसीटीसीला पडला होता.अशी टीका होताच आयआरसीटीसीचे महाव्यस्थापक राहुल हिमालयन यांनी गुजराती संस्कृतीबरोबरच महाराष्ट्राची संस्कृती देखील जपली आहे. गाडीत तैनात असलेले कर्मचारी सुध्दा ‘जय महाराष्ट्र’ म्हणत नमस्कार करत होते.

साजरा केला तीन प्रवाशांचा वाढदिवस

पहिल्याच तेजसमध्ये तीन प्रवाशांचा वाढदिवस केक कापून साजरे करण्यात आला. याशिवाय तेजसचे प्रथम प्रवासी म्हणून तिकीट काढलेल्या महिला, पुरूष आणि महिला ज्येष्ठ व पुरूष ज्येष्ठ नागरिकांना यावेळी सन्मानित केले गेले. त्यात सन्नी श्यामजी आणि रेणू कुशवाह या पुरूष व महिलेसह, पी.एस.सवानुर आणि गेना मदिनाब या दोन ज्येष्ठ नागरिकांना प्रथम प्रवासाचा मान मिळाला.

तेजसची बुकिंग हाउसफुल्ल

मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद मार्गावर धावणार्‍या शताब्दी एक्सप्रेसहून तेजसचे भाडे अधिक आहे. तरी शुक्रवारी धावणार्‍या तेजससह रविवारपासून सुरू होणार्‍या तेजसच्या नियमित फेर्‍यांचे बुकिंगही फुल्ल झाल्याची माहिती आयआरसीटीसीकडून देण्यात आली. त्यामुळे या प्रिमियम ट्रेनला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

पहिल्याच दिवशी तक्रार

पहिल्याच दिवशी ई-२ या एक्जिक्युटिव्ह कोचमधील ट्युबलाईटचे पॅनल पडल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नाही. तसेच प्रवाशांसाठी लावलेल्या टॅबलेटमध्ये काही तांत्रिक दोष निर्माण झाल्याच्या तक्रारीही समोर आल्या. मात्र, त्याचे तत्काळ निराकरण करण्यात आले.छताचा पॅनेल पडला. तेजसच्या पहिल्या फेरीतच एक्झिक्युटिव्ह डब्याच्या छताचे पॅनल पडला, परंतु,सुदैवाने प्रवासी सुखरुप आहेत. मात्र पहिल्याच दिवशी या घटनेची संपूर्ण ट्रेनमध्ये चर्चा रंगली होती. आयआरसीटीसीच्या अधिकार्‍यांनी या घटनेवर माहिती देताना सांगितले की, ही ट्रेन दोन वर्षांपासून तयार होऊन कारशेडमध्ये उभी होती. या कारणास्त या गाडी काही कमतरता असेल, मात्र आम्ही हळूहळू ते पूर्ण करु.

भविष्यात डबे वाढवणार

सध्या तरी तेजसमध्ये २ एक्ििझक्युटिव्ह एसी चेअर आणि ८ फक्त एसी चेअर असे एकूण 10 डबे जोडण्यात आले आहेत. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद कायम राहिल्यास भविष्यात एकूण ३ एक्झिक्युटिव्ह आणि १२ एसी चेअर अशा एकूण १५ डब्यांची तेजस अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल दरम्यान धावेल, असेही आयआरसीटीसीने स्पष्ट केले.

सुरक्षा जवान तैनात

रेल्वे कर्मचारी संघटनेने खासगी ट्रेन म्हणून तेजसला केलेला तीव्र विरोध लक्षात घेता अहमदाबाद ते मुंबईच्या प्रत्येक रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलीस आणि लोहमार्ग पोलिसांना तैनात केले होते.तर अनेक रेल्वे स्थानकांत शेकडो आंदोलकर्त्यांना अटक केल्याची सुध्दा माहिती मिळत आहे.

35 कोटींची तेजस

खासगी तेजसही ट्रेन तयार करण्यास एकूण 35 कोटी रुपयांची गरज आहे. या तेजस एक्स्प्रेसचा प्रत्येक कोच तयार करण्यास सरासरी 3 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या तेजसच्या प्रत्येक दारांची किंमत 10 लाख रुपये आहे. या ट्रेनमध्ये लावण्यात आलेल्या नळावर सुध्दा मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. आयआरसीटीच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या ट्रेनच्या नळासाठी 10 ते 12 रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.एका खासगी तेजसला 35 कोटी रुपये खर्च आयआरसीटीसीला आला आहे.

7 कोटी वार्षिक रेल्वेला देणार भाडे

अहमदाबाद ते मुंबई दरम्यान दुसरी खाजगी तेजस ट्रेन आयआरसीटीसीकडून चालविण्यात येणार आहे. अहमदाबाद ते मुंबई हे अंतर 462 किलो मिटर आहे. ही गाडी दररोज दोनदा धावणार आहे. यासाठी पश्चिम रेल्वेला वार्षिक 7 कोटी आयआरसीटीसीला द्यावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक दिवसला रेल्वेला 2 लाख 20 हजार रुपये रेल्वे विभागाला जाणार आहे.

रेल्वे हॉस्टेसची संकल्पना

विमानातील एअर हॉस्टेसप्रमाणेच तेजसमध्येही रेल्वे हॉस्टेस ही संकल्पना राबवण्यात आली आहे. प्रवाशांच्या डोक्यावर एक कळ (बटण) लावण्यात आले आहे. ते दाबताच एक महिला कर्मचारी प्रवाशांच्या तक्रारीची नोंद घेण्यास उपस्थित असेल. याशिवाय चहा-कॉफीसह नाश्ता व जेवण देण्याचे कामही करण्यासाठी प्रत्येक डब्यात २ महिला व एक पुरूष कर्मचारी पारंपरिक वेशभूषेत उपलब्ध असेल.

प्रवाशांसाठी अफलातून सुुविधा

तेजसमध्ये प्रवाशांना पुस्तक वाचण्यासाठी डोक्यावर लँप दिलेला आहे.स्वयंचलित पडदे असल्याने प्रवाशांना काचेबाहेर हवे तितकेच पाहण्याची व्यवस्था एका क्लिकवर आहे.गाडीतील १० डब्यांमधील दोन डबे एक्झिक्युटिव्ह स्वरूपाचे असून त्यात मनोरंजनासाठी टॅबलेट बसण्यात आले आहेत. ज्यामध्ये प्रवाशांना व्हिडीयोसह चित्रपट, गाणी, गेम्स अशा विविध मनोरंजनाचा आस्वाद घेता येईल.

मदतीला कर्मचार्‍यांचा फौजफाटा

आयआरसीटीच्या तेजसमध्ये एक मॅनेजर , एक असिस्टंट मॅनेजर प्रवाशांच्या सुविधेवर लक्ष देऊन असणार आहे. प्रत्येक डब्यात प्रवाशांचा सुविधेसाठी 3 स्टाफ नियुक्त करण्यात आले आहेत. गाडीत प्रत्येक डब्यात प्रवाशांच्या सेवेत दोन महिला व एक पुरूष नियुक्त करण्यात आले आहे. याशिवाय दोन रेल्वे सुंदरी सुध्दा असणार आहे. तसेच हाऊसकिपिंग, एकूण पाच सुरक्षा रक्षक, मॅनेजर अशी सुसज्ज क्रू टीम प्रवाशांच्या दिमतीला असेल.

देशातील पहिल्या खासगी तेजस एक्स्प्रेसनंतर अहमदाबाद ते मुंबई दरम्यान दुसरी खाजगी तेजस शुक्रवारी सकाळी धावली.या गाडीला गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी हिरवा झेंडा दाखवला. मात्र या या गाडीला रेल्वे कर्मचारी संघटनेने तीव्र विरोध केल्यामुळे रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. सुरूवातीला या एक्स्प्रेसमध्ये गुजराती संस्कृतीचे दर्शन घडणार होते.परंतु, मराठी-गुजराती वाद उफाळल्यानंतर आयआरसीटीसीने याची दखल घेतली त्यानंतर गुजराती साज चढवून तेजस मुंबई सेंट्रलला आली आणि मराठी थाटात अहमदाबादला रवाना झाली.

अहमदाबाद – मुंबई खाजगी तेजस ट्रेनचे उद्घाटन रेल्वे मंत्री व मुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार होते. मात्र खासगी ट्रेन म्हणून रेल्वे कर्मचारी संघटनेचा विरोध आणि त्यात गुजराती-मराठी वादामुळे तेजस एक्सप्रेस वादाच्या भोवर्‍यात सापडली होती.तेजसच्या विरोधात सकाळपासून अहमदाबाद आणि मुंबईत सेंट्रल येथे वेस्टर्न रेल्वे मजदूर संघाने तीव्र निदर्शने केली.त्यामुळे रेल्वे पोलिसांनी अहमदाबाद रेल्वे स्थानकावर अनेक आंदोलनकर्त्यांना अटक सुध्दा केली आहे.मात्र, अखेर तेजस एक्स्प्रेस सकाळी 10 .40 वाजता मुंबईत आली. अहमदाबादमध्ये या तेजस एक्स्प्रेसला पाहण्यासाठी सुध्दा प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.यावेळी गुजरातची लोक कला असलेले गरबा नृत्यसुध्दा अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर सादर करण्यात आले होते.

तिकीट किंमत

एसी चेयर कारचे भाडे- 1 हजार 659 रुपये
एक्जिक्युटिव्ह एसी चेअरचे भाडे- 5 हजार 470 रुपये

प्रवासी क्षमता

तेजस एक्स्प्रेसची प्रवासी क्षमता 736 असणार आहे. यात दोन एक्झिक्युटिव्ह चेअर कार असणार आहे. तर 8 कोच हे एसी चेयर कारचे असणार आहे. प्रत्येक एक्झिक्युटिव्ह डब्यात 56 प्रवाशांची क्षमता आहे. त्यामुळे दोन डब्यात 112 प्रवासी हे एक्जिक्युटिव्ह चेअर कारचे असणार आहे. तर एसी चेयर कारचे प्रत्येक डब्यांची क्षमताही 78 प्रवाशांची आहे.त्यामुळे 8 कोच मध्ये 624 हे एसी चेयर कारचे असणार आहे.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -