घरदेश-विदेशपारतंत्र्याची आणखी एक निशाणी आज पुसली गेली; नौदलाच्या नवीन ध्वजासाठी फडणवीसांकडून मोदींचे...

पारतंत्र्याची आणखी एक निशाणी आज पुसली गेली; नौदलाच्या नवीन ध्वजासाठी फडणवीसांकडून मोदींचे कौतुक

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या नव्या ध्वजाची घोषणा करत असताना हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत आहे असं सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) यांच्या हस्ते भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची आयएनएस विक्रांत(INS vikrant) ही युद्धनौका दाखल झाली आहे. या सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भारतीय नौदलाच्या नवीन ध्वजाचेही अनावरण करण्यात आले. भारतीय नौदल आता अखेर ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाले आहे. भारतीय नौदलावरची (indian navy) ब्रिटिशांची ओळख आता पूर्णपणे पुसली गेली आहे. कारण भारतीय नौदलाच्या नवीन ध्वजात आता तिरंग्यासोबतच छत्रपती शिवाजी शिवजी महाराजांच्या राजमुद्रेच्या आराकातील नवीन चिन्ह देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या नव्या ध्वजाची घोषणा करत असताना हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करत आहे असं सांगितले. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांनी सुद्धा या संदर्भांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. त्याच संदर्भांत फडणवीसांनी एक पोस्ट सुद्धा शेअर केली आहे.

Indian navy got a new ensign the desing is taken from the seal of chhatrapati shivaji maharaj

- Advertisement -

हे ही वाचा – छत्रपती शिवरायांचे स्मरण करत पंतप्रधान मोदींच्या हस्ते भारतीय नौदलाच्या नव्या ध्वज चिन्हाचे अनावरण

देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट –

- Advertisement -

तिरंगा आणि राजमुद्रा…
आज प्रत्येक शिवभक्तासाठी, महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे.
पारतंत्र्याची आणखी एक निशाणी आज पुसली गेली आणि त्याजागी आपल्या लाडक्या, जाणत्या राजाची, शिवछत्रपतींच्या राजमुद्रेच्या आकारातील नवी निशाणी स्थापित झाली!

भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाले. आज आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो आहोत. पण नौदलाच्या ध्वजात आजही ब्रिटिशांच्या राजवटीतील खुणा तशाच होत्या. पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांनी पारतंत्र्याची प्रत्येक ओळख पुसली जावी, हा संकल्प केला होता.

आज भारतीय नौदलाला नवा ध्वज प्राप्त झाला आणि त्याचे अनावरण मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले.
सर्वात आनंदाची आणि अभिमानाची बाब म्हणजे, हा ध्वज तयार करताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासातून प्रेरणा घेत राजमुद्रेतून नवे चिन्ह साकारण्यात आले आहे.

सागरी सुरक्षा आणि नौदलाची प्रथम निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या दूरदृष्टीने केली होती. अतिशय भक्कम आणि मजबूत असे नौदल त्याकाळात साकारण्यात आले होते. त्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण आणि शिवकार्याचा यथार्थ गौरव आज यानिमित्ताने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात झाला!

जगभरातील शिवभक्त, महाराष्ट्र आणि संपूर्ण देशासाठी हा अत्यंत गौरवाचा क्षण आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली, त्याच महाराजांच्या राजमुद्रेने नौदलाच्या ध्वजावरील पारतंत्र्याची शेवटची ओळख पुसली गेली.
॥ जय भवानी जय शिवाजी ॥
॥ जय जिजाऊ जय शिवराय ॥

अशी पोस्ट लिहीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले.

हे ही वाचा – भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका आयएनएस विक्रांत आज नौदलाच्या ताफ्यात; PM मोदींच्या हस्ते अनावरण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून नौदलाचे ध्वजारोहण

यावेळी पीएम मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय नौदलातील कार्याचा उल्लेख करत म्हटले की, भारताने आपल्या मनातून गुलामीची खूण काढून टाकली आहे. भारतीय नौदलाला आजपासून नवा ध्वज मिळाला आहे. आतापर्यंत नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीची खूण होती. मात्र यापुढे नौदलाच्या ध्वजात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेचे प्रतीक फडकणार आहे. आज मी नवा ध्वज नौदलाचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना समर्पित करतो.

हे ही वाचा – भ्रष्ट लोकांविरुद्धच्या कारवाईमुळे राष्ट्रीय राजकारणात फूट, पीएम मोदींचं मोठं वक्तव्य

 

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -