घरताज्या घडामोडी'आम्ही विचारांचे वारसदार'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आणखी एक टीझर प्रदर्शित

‘आम्ही विचारांचे वारसदार’; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आणखी एक टीझर प्रदर्शित

Subscribe

येत्या 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्क येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होणार आहे. तसेच, वांद्र्यातील बीकेसी मैदानात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

“जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो…”, कोणत्याही भाषणाची सुरूवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या वाक्याने करायचे. त्यांच्या याच वाक्याचा वापर करत. तसेच, “शिवसैनिक हा बाजूला सारून मला शिवसेनाप्रमुख म्हणून मिरवता येणार नाही, ही माझी भावना आहे आणि ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे”, असे बाळासाहेब ठाकरेंच्या एका भाषणातील वाक्य वापरून नवा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. या नव्या टीझरमध्ये बाळासाहेबांचे हिंदूत्वावरील भाषण दाखवण्यात आले आहे. (another teaser of Chief Minister Eknath Shinde released for dasara melava)

येत्या 5 ऑक्टोबर रोजी विजयादशमीच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्क येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होणार आहे. तसेच, वांद्र्यातील बीकेसी मैदानात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या दोन्ही मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहेत. मात्र, या मेळाव्यापूर्वी दोन्ही गटात टीझर युद्ध सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

दसरऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा गट आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून सोशल मीडियावर टीझर प्रदर्शित केले जात आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पहिला टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा टीझर आणि आता पुन्हा एकदा शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्याचा दुसरा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांच्या या दुसऱ्या टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या एका सभेतील भाषणाचा वापर करण्यात आला आहे. तसेच, या टीझरचा शेवटी “आम्ही विचारांचे वारसदार”, असे दाखवण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई जीएसटी घोटाळा : 16 विमा कंपन्यांचा तब्बल 824 कोटींचा गैरव्यवहार उघडकीस

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -