सोलापूरात Antibody Cocktail ट्रिटमेंट ठरली यशस्वी, २४ तासात कोरोना रुग्ण बरे झाल्याचा डॉक्टरांचा दावा

२४ तासात उपचार होणाऱ्या या औषधांमुळे रुग्णाचा वेळ आणि पैसा वाचतो,असे डॉ. संजय अंधारे यांनी सांगितले.

Antibody Cocktail Treatment Successful In Solapur Barshi, Doctors Claim Corona Patient recover In 24 Hours
सोलापूरात Antibody Cocktail ट्रिटमेंट ठरली यशस्वी, २४ तासात कोरोना रुग्ण बरे झाल्याचा डॉक्टरांचा दावा

कोरोना लसीनंतर देशाला कोरोनाशी दोन हात करण्यासाठी मिळालेले हत्यार म्हणजे मोनोक्लोनल अँटिबॉडीज (Monoclonal Antibody) सध्या जगभर या मोनोक्लोनल अँटिबॉडीज जोरदार चर्चा आहे. अनेक ठिकाणी याचा प्रभावी वापर होताना दिसत आहे. देशातही अनेकांना या मोनोक्लोनल अँटिबॉडीज देण्यात आल्यात. महाराष्ट्रात सोलापूरात मोनोक्लोनल अँटिबॉडीजच्या Antibody Cocktail ट्रिटमेंट यशस्वी झाल्याचे समोर आले आहे. सोलापूरातील बार्शी येथे कोरोना रुग्णांना Antibody Cocktail दिल्यानंतर रुग्ण २४ तासात बरे झाल्याचा दावा डॉ. संजय अंधारे यांनी केला आहे. (Monoclonal Antibody Cocktail Treatment Successful In Solapur Barshi, Doctors Claim Corona Patient recover In 24 Hours) कोरोनावर मात करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या आतापर्यंतच्या उपचारांमध्ये Antibody Cocktail ट्रिटमेंट सर्वात जास्त प्रभावी असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

सोलापूरातील बार्शी येथील ५ कोरोना रुग्णांवर या उपचार पद्धतींचा अवलंब करण्यात आला. त्यातील ४ रुग्णांवर ही ट्रिटमेंट अत्यंत प्रभावी ठरल्याचा दावा डॉ. संजय अंधारे केला आहे. डायडायबिटीज,लठ्ठपणा,हायपर टेन्शन अशा आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांवर देखील Antibody Cocktail ट्रिटमेंटचा प्रयोग केला. २४ तासात उपचार होणाऱ्या या औषधांमुळे रुग्णाचा वेळ आणि पैसा वाचतो,असे डॉ. संजय अंधारे यांनी सांगितले. विशेष म्हणजे या औषधात कोणत्याही प्रकारचे स्टिरॉइड वापरले जात नाही त्यामुळे म्युकरमायकोसिस किंवा कोरोना नंतर होणाऱ्या कोणत्याही आजाराचा धोका संभवत नसल्याचे डॉ. अंधारे यांनी म्हटले आहे.

Antibody Cocktail ट्रिटमेंटच्या एका इंजेक्शनची किंमत ६० हजार रुपयांच्या आसपास आहे. औषधाची किंमत जरी जास्त असली तरी त्रास कमी होतो आणि कोरोना रुग्ण लवकरात लवकर बरा होतो त्यामुळे नातेवाईकांनाही दिलासा मिळत आहे. अनेक देशात Antibody Cocktailचा वापर केला जात आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना देखील Antibody Cocktail थेरपी देण्यात आली होती.


हेही वाचा – पाच महिन्यांच्या बालिकेला म्युकरमायकोसिस