घरताज्या घडामोडीसंचारबंदीत घराबाहेर फिरणाऱ्यांची केली अँटिजन टेस्टची शक्कल; थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी

संचारबंदीत घराबाहेर फिरणाऱ्यांची केली अँटिजन टेस्टची शक्कल; थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी

Subscribe

संचारबंदीत विनाकारण घराबाहेर पडणे पडले महागात.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्य सरकारने कडक पावल उचलली आहेत. राज्यात दिवसागणिक वाढणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या पाहता महाराष्ट्राची चिंता अधिकच वाढली आहे. गेल्या २४ तासांत महाराष्ट्र राज्यात ६३ हजार २९४ नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर ३४९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू देखील झाला आहे. ही कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात ‘ब्रेक दि चेन’ही मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तर विकेंडला लॉकडाऊन लागू करण्यात आले आहे. मात्र, इतकी गंभीर परिस्थिती असताना देखील नागरिक त्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासन आणि पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकत, ज्या व्यक्ती संचारबंदीत विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशांची अँटिजन टेस्ट करुन त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास त्यांची रवानगी कोविड सेंटरमध्ये करत आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्र राज्यात संचारबंदीतही अनेक जण विनाकारण घराबाहेर पडत आहेत. अशा व्यक्तींना पोलिसांनी समजवून सांगितले तरी त्यांच्यावर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे. याचपार्श्वभूमीवर आता महापालिका आणि पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. मनमाड येथे बरेच नागरिक गरज नसताना देखील घराबाहेर पडत आहेत. अशा व्यक्तींना पोलिसांनी पकडून त्यांची अँटिजन टेस्ट केली. तसेच एखाद्या व्यक्तीची अँटिजन टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास त्या व्यक्तीची रवानगी थेट कोविड सेंटरमध्ये करत आहेत. यामुळे विनाकारण घराबाहेर बाहेर पडणाऱ्यांची संख्या देखील कमी होईल आणि कोरोनाची साखळी तुटण्यासही मदत होईल. त्यामुळे आता महापालिकेने आणि पोलिसांनी एक अनोखे, असे पाऊल उचलले आहे.

राज्यात कडक लॉकडाऊनची शक्यता

राज्यात मोठ्या संख्येत कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता राज्यात कडक लॉकडाऊन करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्सची बैठकही घेतली या बैठकीत राज्यात लॉकडाऊन करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्या बैठकीत गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश तसेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो तेथून ऑक्सिजन तातडीने मागविण्याची कार्यवाही करावी यावरही चर्चा झाली. रेमडीसीवीरचा अति आणि अवाजवी वापर थांबविणे देखील गरजेचे आहे, असे मत टास्क फोर्सने व्यक्त केले.

- Advertisement -

हेही वाचा – स्मशानभूमीबाहेर मृतदेहांचे ढीग; कोरोना रुग्णांना मृत्यूनंतरही भोगाव्या लागताय नरक यातना


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -