घरमहाराष्ट्रगणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात जाणाऱ्या मुंबईकरांना दिलासा! अँटीजन टेस्टने मिळणार गावात एंट्री

गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात जाणाऱ्या मुंबईकरांना दिलासा! अँटीजन टेस्टने मिळणार गावात एंट्री

Subscribe

गणोशोत्सव सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे गणपतीसाठी तळकोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची रेल्वे, एसटी स्टँट आणि एकूणचं कोकण रस्ते मार्गावर गर्दी पाहायला मिळतेय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्ह्याबाहेरून प्रवेश करणाऱ्या आणि लसीचे दोन डोस पूर्ण घेतलेल्या चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश दिली जाईल. मात्र ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले नाहीत अशा कोकणवासियांना जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी ७२ तास पूर्वीचा RTPCR चाचणीचा अधिकृत निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगणे आवश्यक आहे. मात्र ज्या नागरिकांकडे लसीचे दोनही डोस घेतलेले प्रमाणपत्र आणि RTPCR चाचणीचा अहवाल नाही अशा प्रवाशांची मोफत Rapid Antigen Test (RAT) तपासणी जिल्ह्याच्या सीमेवर किंवा रेल्वे स्टेशनला केली जाईल. त्यामुळे गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्गात जाणाऱ्या प्रवाशांसाठी एकप्रकारे दिलासा आहे.

तसेच १८ वर्षाखालील मुलांच्या लसीकरणास अद्याप सुरुवात झाली नसल्याने त्यांना प्रवेशासाठी RTPCR चाचणी अहवालाची आवश्यकता नाही अशा मार्गदर्शक सूचना सिंधुदुर्गाच्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी जाहीर केल्या. याशिवाय जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या नागरिकांची महसूल, आरोग्य आणि पोलीस पथकामार्फत जिल्हा प्रवेशाच्या ठिकाणी चेक पोस्टवर किंवा रेल्वे स्थानक आणि बस स्थानकावर नोंदणी होईल.

- Advertisement -

तसेच मुंबई, पुणे आणि इतर जिल्ह्यातून एस.टी बसमधून येणाऱ्या प्रवाशांची माहिती, बस सुटण्याच्या ठिकाणाहून विहित नमुन्यामध्ये दोन प्रतीत भरली जाईल. ज्याची एक प्रत जिल्हा प्रवेशाच्या ठिकाणी चेक पोस्टवर जमा करावी लागेल. तर दुसरी माहिती प्रत वाहनचाकल आणि तालुक्याच्या एसटी डेपोमध्ये जमा करावी लागेल. एसटी विभागाने सदर माहिती संकलीत करण्याकरिता नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी सदर माहिती संबंधित तहसील कार्यालयात रोजच्या रोज सायंकाळी ५ वाजेपर्यंत जमा करावी.

सिंधुदुर्गवात येणाऱ्या प्रवाशांसाठी नवे नियम : –

१) कोरोनाविरोधी लसींचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना सर्टिफिकेट दाखवून सिंधुदुर्गात प्रवेश करण्याची मुभा असेल.

- Advertisement -

२) १८ वयोगटातच्या आतील बालके, तरुण यांच्या लसीकरणाला अद्याप सुरुवात न झाल्याने त्यांनाही प्रवेशाची मुभा असेल.

३) ७२ तास अगोदर केलेली आरटीपीसीआर टेस्ट केलेल्या नागरिकांना प्रवेशाची मुभा, टेस्ट न केलेल्या नागरिकांची टेस्ट करत त्यांना गणेशोत्सवासाठी मोकळं केलं जाईल.

४) आरटीपीसीआर चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवले जाईल.

५) दोन डोस झालेले नसल्यास RTPCR रिपोर्ट बंधनकारक

६) कोरोना चाचणीस व कोरोना बाधित व्यक्तीच्या विलगीकरणास विरोध करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस कारवाई करण्यात येईल.

६) रेल्वे स्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी तीन रंगा असणार एक दोन डोस घेतलेले नागरिक, दुसरी १८ वर्षाखालील, आणि तिसरे टेस्ट न केलेल्या नागरिकांसाठी.

७) चेकपोस्टवर कार्यरत कर्मचारी लहान खाजगी वाहनांच्या चालकाकडून गाडी नंबर आणि प्रवासी संख्या व एका प्रमुख व्यक्तीचा मोबाईल क्रमांक, नाव व पत्ता याची माहिती घेईल.

७) जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर मास्क घालणे सक्तीचे

८) जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर सामाजिक अंतर राखणे आवश्यक

९) एकाच ठिकाणी मोठ्या संख्येनं गर्दी करण्यास मनाई


राज्यातील सर्व महाविद्यालये दिवाळीनंतर होणार सुरु, उदय सामंत यांची माहिती


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -