अंबानी स्कॉर्पिओ स्फोटक प्रकरण NIA कडे

Antilia bomb scare probe transferred to NIA, Mansukh Hiren death case to remain with Maharashtra ATS

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर २५ फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आढळली होती. यामुळे मुंबईतच नाही तर संपूर्ण देशभरात एकच खळबळ माजली. पण या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह एका खाडीत सापडल्यामुळे प्रकरणाला एक वेगळंच वळणं लागलं. त्यामुळे याप्रकरणाचा तपास राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणनेकडे (NIA) सोपवण्याची मागणी भाजप पक्षाचे नेते करत होते. आता अखेर या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणनेकडे सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी मनसुख हिरने यांच्या हत्येचा गुन्हा दहशतवादविरोधी पथक (ATS)कडून दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसुख हिरने यांच्या पत्नी आणि मोठ्या मुलाने एटीसच्या कार्यालयात जाऊन केली होती. आता हे प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात आली आहे.

२५ फेब्रुवारी रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटेलिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी सापडली. यामुळे मुंबईसह संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणाचा तपास पहिल्यांदा एनकाउंटर स्पेशलिस्ट सचिन वाझे यांच्या हाती होता. पण त्यानंतर सचिन वाझे यांना या तपासातून हटवून दुसऱ्या पोलीस अधिकाऱ्याला देण्यात आला होता.


हेही वाचा – अंबानी, स्फोटक भरलेली स्कॉर्पियो, मनसुख, वाझे ते मुंब्रा खाडी—काय आहे प्रकरण?