Friday, February 19, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय डॉनशी संबंध असलेल्या गणेश नाईकांची SIT मार्फत चौकशी करा - सुप्रिया...

आंतरराष्ट्रीय डॉनशी संबंध असलेल्या गणेश नाईकांची SIT मार्फत चौकशी करा – सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहणार

Related Story

- Advertisement -

माजी मंत्री आणि भाजपचे आमदार गणेश नाईक यांचे संबंध आंतरराष्ट्रीय डॉनसोबत असतील तर त्यांची एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. हा देशाच्या सुरक्षेचा मुद्दा असल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून चौकशीची मागणी करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. काही दिवसांपूर्वी स्वत: गणेश नाईक यांनी त्यांचे संबंध आंतरराष्ट्रीय डॉनसोबत असल्याचं जाहीर सभेत सांगितलं होतं. हा मुद्दा पकडत सुप्रिया सुळे यांनी गणेश नाईक यांची SIT मार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

गणेश नाईक यांचे संबंध आंतरराष्ट्री डॉन सोबत संबंध असतील तर त्यांची चौकशी करावी. हा देशाच्या सुरक्षेचा मुद्दा आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी करणार असल्याचं सांगितलं. काही दिवसांपूर्वी तुर्भेमधील भाजपच्या कार्यक्रमात गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांना कोणालाही घाबरु नका. आपले संबंध आंतरराष्ट्रीय डॉनसबोत आहेत, असं विधान केलं होतं.

काय म्हणाले होते गणेश नाईक?

- Advertisement -

आगामी महापालिकेची निवडणूक जशी जवळ येत आहे तसं राजकारण तापलं आहे. निवडणुकीच्या आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपचे काही नगरसेवक फोडले आहे. यावर भाष्य करताना गणेश नाईक यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. “कोणत्याही गुंडगिरीला घाबरु नका. रात्री अपरात्री मला कधीही फोन करा. इथलेच काय इंटरनॅशनल डॉन सुद्धा मला ओळखतात. त्यामुळे घाबरायची गरज नाही, असं गणेश नाईक यांनी जाहीर भाषणात सांगितलं होतं.

 

- Advertisement -