कोकणातल्या हापूस आंब्याची ‘अमेरिका’ स्वारी; पुन्हा निर्यातीला सुरुवात

उन्हाळा सुरू झाला की सर्वांनाच आब्यांची चाहूल लागते. कोकणातील हापूसची चव चाखण्यासाठी देशातीलच नव्हे तर परदेशातून मोठी मागणी असते. त्यानुसार दरवर्षी हापूस आंब्याची परदेशात निर्यात केली जाते. मात्र मागील दोन वर्ष कोरोना महामारीमुळं आंब्याची निर्यात पर्णपणे थांबली होती.

उन्हाळा सुरू झाला की सर्वांनाच आंब्याची चाहूल लागते. कोकणातील हापूसची चव चाखण्यासाठी देशातीलच नव्हे तर परदेशातून मोठी मागणी असते. त्यानुसार दरवर्षी हापूस आंब्याची परदेशात निर्यात केली जाते. मात्र मागील दोन वर्ष कोरोना महामारीमुळं आंब्याची निर्यात पर्णपणे थांबली होती. ही निर्यात आता पुन्हा सुरू झाली आहे. कोरोनानंतर निर्यातीवरील सर्व निर्बंध हटविण्यात आल्यानंतर आंब्याची मागणी वाढली आहे. कोकणच्या हापूस आंब्याची निर्यात लासलगाव मार्गे अमेरिकेत (USA) सुरु झालेली आहे. कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाद्वारे सुलभ आंब्याच्या हंगामाची पहिली तुकडी 11 एप्रिल 2022 रोजी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका येथे पोहोचली.

अल्फोनसो, केसर आणि बंगनापल्ली या जातींचे आंबे मेसर्स गुरुकृपा कॉर्पोरेशनने कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या (APEDA) मंजूर सुविधेवर पॅकिंग आणि इरॅडिएशननंतर निर्यात केले. APEDA निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी व्हर्च्युअल ट्रेड फेअर्स, फार्मर कनेक्ट पोर्टल, ई-ऑफिस, हॉर्टिनेट ट्रेसेबिलिटी सिस्टम, बायर सेलर मीट्स, रिव्हर्स बायर सेलर मीट्स, उत्पादन स्पेसिफिक कॅम्पेन इत्यादींसह विविध निर्यात प्रोत्साहन उपक्रमांचे आयोजन करते.

राज्यातून निर्यातीला चालना देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी APEDA राज्य सरकारसोबत काम करत आहे. APEDA निर्यातदारांना पायाभूत सुविधांचा विकास आणि बाजारपेठ सुलभतेमध्ये मदत करून कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यातीला प्रोत्साहन देते. याव्यतिरिक्त, APEDA कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय खरेदीदार विक्रेता मीट (बीएसएम), आयात करणार्‍या देशांसोबत व्हर्च्युअल व्यापाऱ्यांचे मेळे देखील आयोजित केले जातात.

कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून कोकणच्या हापूस आंब्यावर संक्रातीची वेळ आली होती. कोरोनामुळे देशातील आणि देशाबोहेरील सर्व व्यवहार बंद होते. ज्यामुळे आंब्याच्या निर्यातीवर परिणाम झाला होता. तर निर्यात बंद झाल्याने व्यापारी ही संकटात सापडले होते. त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते. आता मात्र कोकणच्या हापूस आंबा व्यवसायिकांसाठी आनंदाची आणि चांगली बातमी आली असून कोकणच्या हापूस आंब्याची निर्यात पुन्हा सुरू झाली आहे.


हेही वाचा – काँग्रेस-शिवसेना आमच्यासोबत फिरायला तयार मात्र लग्नाला नाही, युतीवरुन प्रकाश आंबेडकरांचे मोठं वक्तव्य