घरमहाराष्ट्रनाशिकमाफी मागा अन्यथा तीव्र आंदोलन; भाजप महिला आघाडीचा भुजबळांना इशारा

माफी मागा अन्यथा तीव्र आंदोलन; भाजप महिला आघाडीचा भुजबळांना इशारा

Subscribe

नाशिक : भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्या नेतृत्वात गुरूवारी भुजबळ यांच्या निवासस्थानासमोर देवी सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन करण्यात येऊन आरती करण्यात आली. छगन भुजबळ यांनी आपल्या वक्तव्याबददल माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा खापरे यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ बुधवारी भुजबळ यांच्या निवासस्थानी भुजबळ फार्म येथे निषेध आंदोलन केले होते. यानंतर आता भाजपच्या महिलादेखील आक्रमक झाल्या आहेत. त्यांनीही छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म या निवासस्थानी धडक देत प्रवेशद्वारावर सरस्वतीची प्रतिमा घेऊन जात पूजन केले. यावेळी भाजप महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी संध्या कुलकर्णी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, महिला आघाडी शहराध्यक्षा हिमगौरी आडके, रोहिणी नायडू, अलका आहेर, अलका जांभेकर, मनीषा पवार, छाया देवांग यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

सरस्वती माता विद्येची देवता आहे. मग हा फोटो शाळेत का नको? महापुरूषांच्या फोटोंना आमचा विरोध नाही. मुले शाळेत जाण्यापूर्वी सरस्वती पूजन करतात हे आपण विसरलात का ? सावित्रीबाईं फुलेंनी सांगितले आहे सरस्वतीचा हा दरबार खुला जाहला पाहु चला, शाळेमधे शिकुनी घेऊ ज्ञान मिळूनी चला.. चला ग चला हे फुलेंच्या काव्यसंग्रहातील वाक्य आहे मग हा फुलेंचा अपमान नाही का? भुजबळांनी माफी मागावी अन्यथा ही आंदोलने सुरूच राहतील. : उमा खापरे, प्रदेशाध्यक्षा भाजप महिला आघाडी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -