घरमहाराष्ट्रविधान परिषद निवडणुकीसाठी आठ उमेदवारांचे अर्ज बाद; नाशिकची काय परिस्थिती?

विधान परिषद निवडणुकीसाठी आठ उमेदवारांचे अर्ज बाद; नाशिकची काय परिस्थिती?

Subscribe

मुंबई – विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली. या छाननीत आठ उमेदवारांचे अर्ज बाद झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.

विधान परिषदेच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर तसेच कोकण, औरंगाबाद, नागपूर शिक्षक विभाग मतदारसंघासाठी येत्या ३० जानेवारीला निवडणूक होत आहे. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत काल, गुरुवारी संपल्यानंतर आज उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात आली.

- Advertisement -

हेही वाचा – काँग्रेस एक डुबते जहाज.., त्यांनी स्वत:चीच माणसं सांभाळावीत, बावनकुळेंची टीका

या छाननीत नाशिक पदवीधर मतदारसंघात ७ तर अमरावती पदवीधरमध्ये एक अर्ज अवैध ठरला. नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघात अनुक्रमे २२ आणि ३३ अर्ज वैध ठरले. तर कोकण, औरंगाबाद आणि नागपूर शिक्षक मतदारसंघात सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत १६ जानेवारी आहे. या मुदतीनंतर विधान परिषद निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

- Advertisement -

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या पाच जागांसाठी तब्बल ११८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते.यापैकी सर्वाधिक म्हणजे ३४ अर्ज हे अमरावती पदवीधर मतदारसंघातून होते. अमरावतीतून आता १ अर्ज बाद ठरल्याने ३३ अर्ज वैध ठरले आहेत.

हेही वाचा – बाहेरून आलेल्यांना रिझर्व्हेशन आणि निष्ठावंतांची घुसमट, काँग्रेसची भाजपावर टीका

नाशिकमधून २९ उमदेवारांनी अर्ज भरले होते. मात्र, यामध्ये ७ उमेदवारांचे अर्ज निवडणूक आयोगाने अवैध ठरवले. त्यामुळे आता २२ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. दरम्यान, नाशिकमधील लढत महाविकास आघाडी आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची लढाई आहे. कारण, या मतदारसंघातून भाजपाने उमेदवार उभा केला नव्हता. तर, महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या वतीने डॉ.सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांनी त्यांनी उमेदवारी मागे घेत सत्यजित तांबेंना उमेदवारी दिली.  परंतु, तांत्रिक अडचण झाल्याचे सांगत सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरला. तसंच, आपण अपक्ष अर्ज भरला असला तरीही काँग्रेसलाच पाठिंबा देणार असल्याचं सत्यजित तांबेंनी स्पष्ट केलं होतं. परंतु,काँग्रेसने सत्यजित तांबेंचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे भाजपा त्यांना पाठिंबा देऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -