घरमहाराष्ट्रभाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती

भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती

Subscribe

मुंबई – भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षाच्या प्रदेश महिला मोर्चा अध्यक्षपदी चित्रा वाघ यांची नियुक्ती केली.

भाजपा प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्षांनी चित्रा वाघ यांना नियुक्ती पत्र प्रदान केले. यावेळी प्रदेश सरचिटणीस ॲड. माधवी नाईक, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील व मावळत्या महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष उमा खापरे उपस्थित होते.

- Advertisement -


चंद्रशेखर बावनकुळे यांनी चित्रा वाघ यांना नव्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचा महिला मोर्चा संघटनात्मकदृष्ट्या अधिक बळकट होईल. तसेच विविध पक्षांमधील महिला कार्यकर्त्या भाजपाशी जोडल्या जातील, अशी अपेक्षा आहे.


चित्रा वाघ म्हणाल्या की, राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने महिलांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. ते राज्यातील महिलापर्यंत पोहचविण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करण्यावर आपण भर देऊ.

- Advertisement -

दरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन पक्षाने माझ्यावर जो विश्वास दाखवला, तो मी नक्कीच सार्थ ठरवेन. महिलांचे प्रश्नांना न्याय देण्याबरोबरच संघटन स्तरावर पक्ष मजबूत करण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन. माझी निवड केल्याबद्दल भारतीय जनता पक्ष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनापासून धन्यवाद, अशी प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -