Monday, June 21, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी प्रा. दिवाकर गमे यांची नियुक्ती, पक्ष बळकट होणार...

महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी प्रा. दिवाकर गमे यांची नियुक्ती, पक्ष बळकट होणार – जयंत पाटील

नागपूर शहर जिल्हाध्यक्षपदी दुणेश्र्वर सूर्यभान पेठे यांची नियुक्ती

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र प्रदेश महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी प्रा. दिवाकर गमे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते गमे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २२ वर्षांचा यशस्वी टप्पा पुर्ण केला आहे. या २२ वर्षांच्या वाटचालीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह नेत्यांनी बरेच चांगले आणि अनुभव घेतला आहे. तर आता प्रा. दिवाकर गमे यांची नियुक्ती झाल्याने पक्ष मजबूत आणि बळकट करण्यासाठी अधिक सहकार्य मिळे असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. तसेच विदर्भातील ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधेंसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

विदर्भातील ओबीसी चळवळीमधील कार्यकर्ते व महाज्योतीचे संचालक म्हणून प्रा. दिवाकर गमे यांची ओळख आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्ष बळकटीकरणासाठी प्रा. दिवाकर गमे यांचे सहकार्य राहील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. यावेळी प्रदेश सरचिटणिस शिवाजीराव गर्जे, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, सरचिटणीस राज राजापूरकर, युवक अध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, निळकंठ पिसे, विनय डहाके उपस्थित होते.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नियुक्ती पत्र दिले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षपदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी आपले सहकार्य राहील असा विश्वास आहे. असे जंयत पाटील यांनी नियुक्तीत्रात म्हटले आहे.

नागपूर शहर जिल्हाध्यक्षपदी दुणेश्र्वर पेठे यांची नियुक्ती

- Advertisement -

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नागपूर शहर जिल्हाध्यक्ष पदी दुणेश्र्वर सूर्यभान पेठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत पेठे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस प्रवीण कुंटे पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, नागपूर ग्रामीण अध्यक्ष शिवराज गुजर, अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष जावेद हबीब उपस्थित होते.

- Advertisement -