Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदावरील विद्याधर अनास्कर यांची नियुक्ती रद्द

महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदावरील विद्याधर अनास्कर यांची नियुक्ती रद्द

Subscribe

मुंबई – सहकारी बँकिंग क्षेत्रात गेल्या तीन दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले ज्येष्ठ बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदावरील नियुक्ती नव्या सरकारने रद्द केली आहे.

हेही वाचा – शहीद म्हणजे नक्की कोण, एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीने व्याख्याच सांगितली

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकारने ऑगस्ट २०२१ मध्ये अनास्कर यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. पण सहकार परिषदेच्या पुनर्रचनेच्या नावाखाली नव्या सरकारने ही नियुक्ती रद्द केली आहे.

केंद्र सरकारने तयार केलेल्या ‘बँकिंग रेगुलेशन अँक्ट’ च्या विरोधात विद्याधर अनास्कर यांनी सादरीकरण केले होते. या नव्या कायद्यानुसार बँकेच्या संचालक मंडळातील ५१ टक्के संचालक हे विशिष्ट शैक्षणिक पात्रता तसेच विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञ असावेत तसेच त्यांचा कार्यकाळ आठ वर्षांचा असावा अशी तरतूद होती. मात्र विद्याधर अनास्कर यांना हे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत अभ्यास करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सादरीकरण केले होते.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबईत ठाकरे विरुद्ध शेलार सामना रंगणार

त्यांनतर शरद पवार यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे सादरीकरण आघाडी सरकारच्या सर्व मंत्र्यांना तसेच सहकार आयुक्तांना दिले होते. यादरम्यान विद्याधर अनास्कर यांची आघाडी सरकारमधील नेत्यांशी झालेली जवळीक कदाचित त्यांना या पदावरून दूर करण्यास कारणीभूत ठरली असावी, अशी चर्चा सहकार क्षेत्रात आहे.

- Advertisment -