घरताज्या घडामोडीअमित ठाकरेंकडून 'मनविसे'ची पुनर्बांधणी; विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

अमित ठाकरेंकडून ‘मनविसे’ची पुनर्बांधणी; विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचे पूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) सध्या राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (MNSU) अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून ते विद्यार्थी संघटनेची पुनर्बांधणी करत आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांचे पूत्र अमित ठाकरे (Amit Thackeray) सध्या राज्याच्या राजकारणात सक्रिय झाल्याचे पाहायला मिळत आहे. अमित ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या (MNSU) अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून ते विद्यार्थी संघटनेची पुनर्बांधणी करत आहेत. त्यानुसार, आता मुंबईतील काही विधानसभा मतदासंघांतील मनविसेच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. (Appointments of MNSU office bearers announce by Amit Thackeray)

मनसेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, मागील अनेक महिन्यांपासून अमित ठाकरे हे महाराष्ट्रातील बऱ्याच भागात दौरे करत आहेत. या दौऱ्यात स्थानिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी अमित ठाकरे २ आठवडे मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात फिरत आहेत. यासंदर्भात अमित ठाकरे यांनी एक फेसबुक पोस्ट रविवारी सोशल मीडियावर शेअर केली. यामध्ये त्यांनी विद्यार्थी विद्यार्थ्यांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -

अमित ठाकरेंची फेसबुक पोस्ट

“महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पुनर्बांधणीसाठी गेल्या दोन आठवड्यांत मी मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात गेलो. प्रत्येक ठिकाणी शेकडो महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी भेटायला येत होते. मनविसेत जबाबदारी स्वीकारून काम करायचं आहे असं आग्रहाने सांगत होते. माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या या तरुणाईचा मी खरंच आभारी आहे. मुंबईत हे संपर्क अभियान यशस्वी होण्यामागे फक्त आणि फक्त मनसेचे तसंच मनविसेचे सर्व पदाधिकारी, महाराष्ट्र सैनिकांची अपार मेहनत आहे. तुम्हा सर्वांच्या सहकार्यानेच मनविसे ही सर्वात प्रबळ आणि प्रभावी विद्यार्थी संघटना बनणार आहे. मनविसेच्या संघटनात्मक बांधणीसाठी आपला अमूल्य वेळ देऊन सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार.”, असे अमित ठाकरे यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिले आहे.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी अमित ठाकरे यांनी मनविसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ‘तुमच्या महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे युनिट स्थापन करण्यासाठी कामाला लागा’, अशा सूचना दिल्या. तसेच, “विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे विषय समजून घेऊन शैक्षणिक समस्या सोडविण्यावरच भर द्यावा”, अशाही सूचना त्यांनी दिल्या.

अमित ठाकरेंच्या या सुचनांनंतर मनविसेचे पदाधिकारी आणि मनविसेत नव्याने सामील होऊन काम करू इच्छिणाऱ्या महाविद्यालयीन तरुण तरुणींशी ते संवाद साधत आहेत. त्यांच्या शैक्षणिक अडचणी जाणून घेत आहेत.


हेही वाचा – उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचा सल्ला

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -