घरताज्या घडामोडीअयोध्येत लहान मुलांना परवानगी आहे का? नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

अयोध्येत लहान मुलांना परवानगी आहे का? नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना खोचक टोला

Subscribe

ज्ञानवापी प्रकरणात (Gyanvapi Case) शिवसेनेने अद्यापही त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे शिवसेनेने आधी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हानही नितेश राणे यांनी दिले आहे. 

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) १५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. रामलल्लाचे दर्शन घेतल्यानंतर ते शरयू नदीवर महाआरतीही करणार आहेत. या दौऱ्याचं नियोजन करण्याकरता शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. लहान मुलांना अयोध्येत परवानगी आहे का असा सवाल करत त्यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते. (Are children allowed in Ayodhya? Nitesh Rane slammed Aditya Thackeray)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Raj Thackeray) अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. मात्र, त्यांच्या पायाच्या शस्त्रक्रियेसाठी त्यांनी हा दौरा पुढे ढकलला. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी अयोध्येला (Ayoddhya Visit) जाण्याची घोषणा केली. या दौऱ्यासाठी शिवेसनेकडून जोरदार तयारीही सुरू आहे. तसेच आमचा हा दौरा राजकीय नाही हा आमचा धार्मिक दौरा आहे, असेही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

ज्ञानवापीबाबत शिवसेनेने भूमिका स्पष्ट करावी

ज्ञानवापी प्रकरणात (Gyanvapi Case) शिवसेनेने अद्यापही त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे शिवसेनेने आधी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान नितेश राणे यांनी दिले आहे.

- Advertisement -

संजय राऊत (Sanjay Raut) बाहेरून आले आहेत. संजय पवार हे खरे शिवसैनिक आहेत, असं नितेश राणे म्हणाले. संजय राऊत निर्लज्ज आहेत. माँसाहेब आणि बाळासाहेब यांच्यात वाद असल्याचा त्यांनी लेख लिहिला होता. त्यामुळे त्यांना शिवसेनेचे आमदार मतं देतील का? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. सेफ मतं संजय पवार यांना द्यावीत आणि उर्वरित मतं संजय राऊत यांना द्यावीत असं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान, संजय राऊत यांना लीलावतीला पाठवण्याची वेळ आली असल्याचंही ते म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -