घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रगाडी ठोकल्याने सुरू झाला वाद, शेवट थेट खून करूनच झाला

गाडी ठोकल्याने सुरू झाला वाद, शेवट थेट खून करूनच झाला

Subscribe

नाशिक : येवला तालुक्यातील निळखेडा शिवारातील खूनाचा तपास तालुका पोलिसांनी लावला असून, दोन युवकांना अटक केली आहे. अपघात झाल्यावर झालेल्या वादातून हा खून झाल्याचे कारण पुढे आले आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाआधारे दोघांना अटक केली. येवला न्यायालयाने दोघांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

कृष्णा बाळु कोकाटे, (वय ३६, रा. आंबेगांव ता. येवला), पांडुरंग गोविंदराव राठोड (४१, रा. करंजगव्हाण ता. मालेगांव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राजू (रा. चांदूर, जि. अमरावती) असे मृताचे नाव आहे. येवला तालुका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ एप्रिल २०२३ रोजी निळखेडा शिवार (ता. येवला, जि. नाशिक) येथील विजया शांताराम कदम यांच्या शेतात बारदानामध्ये अर्धवट मृतदेह आढळून आला. गावकामागार पोलीस पाटील सोमठाणदेश सुनील कदम यांनी येवला तालुका पोलीस ठाण्यास माहिती दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

- Advertisement -

येवला तालुका पोलिसांनी तपासाचे सूत्र वेगाने फिरवत अनोळखी इसमाचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. खूनप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली. त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.या खूनाचा तपास पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंग साळवे यांच्या सूचनेनुसार येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपुत, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, पोलीस उपनिरीक्षक अल्ताफ शेख, पोहवा. माधव सानप, पो.नाइक राजेंद्र केदारे, सचिन वैरागर, ज्ञानेश्वर पल्हाळ, पो.कॉन्स्टेबल आबा पिसाळ, सागर बनकर संतोष जाधव, संदीप दराडे, नितीन पानसरे यांनी केला.

या कारणातून केला खून अन् पुरावा नष्टचा प्रयत्न

 संशयित आरोपी कृष्णा कोकाटे व मृत राजू हे लासलगावहून कटींग व मद्यप्राशन करून दुचाकीने आंबेगावच्या दिशेने येत होते. त्यांचा रस्त्यात अपघात झाला. अपघातात राजू यास जखमा झाल्या होत्या. दरम्यान, राजू व कृष्णा कोकाटे यांच्यात भांडण झाले. दोघांनी विहिरीवर येऊन आंघोळ केली. त्यावेळी पुन्हा त्यांचे भांडण झाले. रागाच्या भरात कृष्णा कोकाटे याने राजू याचा दोन्ही हाताने गळा आवळून खून केले. त्यानंतर त्यास विहिरीत ढकलून दिले. कोकाटे याने इलेक्ट्रीक मोटार चालू करून विहिरीचे पाणी काढून राजू यास दोर बांधून बाहेर काढत कृष्णा कोकाटे व पांडूरंग राठोड यांनी राजू याचा मृतदेह दुचाकीवर टाकून निळखेडा शिवारात आणून खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, अशी दोघांनी पोलिसांना कबुली दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -