घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीतील वाद शिगेला; अजित पवार गटाने 'एका'चे नाव वगळून दिले दाखल केली...

राष्ट्रवादीतील वाद शिगेला; अजित पवार गटाने ‘एका’चे नाव वगळून दिले दाखल केली याचिका

Subscribe

खरी शिवसेना कुणाची आणि 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या सुरू असताना दुसरीकडे मात्र, राष्ट्रवादीतील दोन्ही गट आता आमने-सामने आले आहेत. शरद पवार गटाकडून अजित पवार गटातील आमदारांवर कारवाईचे याचिका दाखल करण्यात आली होती.

मुंबई : शिवसेने पाठोपाठ आता राष्ट्रवादीतील वादही अधिक तीव्र होताना दिसत आहे. शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या विरोधात कारवाईला वेग आल्यानंतर आता अजित पवार गट देखील शरद पवार गटाविरोधात आक्रमक झाला आहे. अजित पवार गटाने शरद पवार गटातील आमदारांविरोधात कारवाई संदर्भात देण्यात आलेल्या विधीमंडळाकडील याचिकेत मात्र, एका आमदारांचे नाव वगळण्यात आले आहे. त्यामुळे ते आमदार कोण असा प्रश्न यानिमित्ताने विचारल्या जात आहे. (Arguments within the Nationalist Party began Ajit Pawar group filed a petition omitting the name of Eka)

खरी शिवसेना कुणाची आणि 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या सुरू असताना दुसरीकडे मात्र, राष्ट्रवादीतील दोन्ही गट आता आमने-सामने आले आहेत. शरद पवार गटाकडून अजित पवार गटातील आमदारांवर कारवाईचे याचिका दाखल करण्यात आली होती. आता अजित पवार गटानेसुद्धा विधीमंडळाकडे शरद पवार गटातील 11 पैकी दहा आमदाराविरुद्ध कारवाई करण्याची याचिका दाखल केली आहे. यादरम्यान मात्र, त्यांनी शरद पवार गटातील एका आमदारांचे नाव वगळले आहे.

- Advertisement -

अजित पवार गटाच्या याचिकेत काय म्हटले?

राष्ट्रवादीत सध्या दोन गट निर्माण झाले असून, शरद पवार गट आणि अजित पवार गट. दोन्ही पक्ष एकमेंकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असताना आता अजित पवार गटाने विधीमंडळाकडे आमदारांवर कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. विधीमंडळाकडे देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, शरद पवार गटातील शरद पवार गटातील दहा विधानसभेच्या आमदारांविरोधात आणि विधानपरिषदेच्या तीन आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करावी, कारण, त्यांनी पक्ष विरोधी कृती केले आहे असेही याचिकेत म्हटले आहे.

हेही वाचा : WORLD CUP 2023 : विश्वचषकात उत्कृष्ट कामगिरीसाठी ‘अशी’ मिळणार बक्षिसं; आयसीसीकडून यादी जाहीर

- Advertisement -

या आमदारांवर कारवाई करण्याची केली मागणी

अजित पवार गटाने विधीमंडळाकडे दाखल केलेल्या याचिकेत शरद पवार गटातील विधानसभेतील आमदार जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, सुमन पाटील, सुनील भुसारा, प्राजक्त तनपुरे, बाळासाहेब पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, संदीप क्षिरसागर यांच्यासह विधान परिषदेतील शशिकांत शिंदे, अरुणकाका लाड आणि एकनाथ खडसे यांचा समावेश आहे.

हेही वाचा : भाजपात असलेले मुसलमान ‘हे’ सगळं कस काय सहन करतात? ओमर अब्दुल्लांचा संतप्त सवाल

या आमदारांचे वगळले नांव

अजित पवार गटाने विधिमंडळाकडे याचिका दाखल करताना शरद पवार गटातील एका आमदाराचे नाव वगळले आहे. याचिकेत शिरूरचे आमदार अशोक पवार यांचं नाव नाही. तेव्हा हे नाव वगळल्यानंतर एका आमदाराला अजित पवार गटाने गळाला लावल्याची चर्चा रंगत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -