Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश 'सारस'शी मैत्री,आरिफवर FIR: पोपट-कासव पाळल्यास थेट तुरुंगवास; जाणून घ्या कोणते पक्षी-प्राणी पाळू...

‘सारस’शी मैत्री,आरिफवर FIR: पोपट-कासव पाळल्यास थेट तुरुंगवास; जाणून घ्या कोणते पक्षी-प्राणी पाळू शकता?

Subscribe

सारस पक्षी घरात ठेवल्यामुळे अमेठीच्या आरिफवर गुन्हा दाखल. कोणते पक्षी आणि प्राणी पाळू शकतो जाणून घ्या

अमेठीचे रहिवासी आरिफ गुर्जर आणि सारस पक्षाची मैत्री एक उदाहरण ठरत असताना, त्यावरुन आता वादही होत आहेत. ऑगस्ट २०२२ मध्ये आरिफची सारस पक्षाशी भेट झाली होती. त्यावेळी सारस पक्षी जखमी होता. आरिफने त्याचा जीव वाचवला. तेव्हापासून सारस त्याच्यासोबत कुटुंबात राहू लागला आणि त्या दोघांमध्ये भावनिक नाते तयार झाले. सारस पक्षी जेव्हा त्याचं मन होईल तेव्हा उडून जायचा, मग तो परत येऊन आरिफसोबत राहायचा.

आरिफ आणि सारस यांच्यातील मैत्रीचे काही व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. याची माहिती वनविभागाला मिळताच त्यांनी सारस पक्षाला समसपूर पक्षी अभयारण्यात सोडले. तेथून सारस त्याचा मित्र आरिफच्या शोधात जवळच्या गावात गेला. वनविभागाने त्याला पुन्हा पकडले. यानंतर त्या सारस पक्षाला कानपूर प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आले. सारसने खाणेपिणे बंद केले आहे, त्यामुळे आता सारसला आरिफजवळ ठेवायचे की ठेवू नये याबाबत मोहिम राबवली जात आहे. त्यामुळे कोणत्या पक्षी वा प्राण्याला आपण पाळू शकतो, याबाबत आज जाणून घेऊया.

सारस पाळण्यावर आपल्या देशात बंदी आहे का?

- Advertisement -

देशात काही प्राणी पाळण्यावर बंदी आहे. ज्या अंतर्गत सारस पक्षीदेखील येतो. त्यामुळेच आरिफवर वन्यजीव संरक्षण कायदा 1972 चे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 2, 9, 29, 51 आणि कलम 52 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याचा अर्थ आरिफची सारसशी असलेली मैत्री चुकीची आहे का?

वन्यजीव (संरक्षण) कायद्याच्या कलम 39 अन्वये जेव्हा आरिफला जखमी सारस सापडले तेव्हा त्याने प्राथमिक उपचार केल्यानंतर स्थानिक वनविभागाच्या अधिकाऱ्याला कळवायला हवे होते. त्याला जवळच्या पोलीस ठाण्यातही याची माहिती देता आली असती. कायदेशीररित्या या कामासाठी व्यक्तीला ४८ तास असतात. कोणताही संरक्षित पक्षी किंवा प्राणी ठेवणे किंवा त्यांना खायला देणे बेकायदेशीर आहे.

वन्यजीव संरक्षण कायदा म्हणजे काय?

- Advertisement -

प्राणी आणि पक्षांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी भारत सरकारने सन १९७२ मध्ये भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा केला होता. वन्य प्राण्यांची अवैध शिकार, मांस आणि कातडीचा ​व्यापार थांबवणे हा त्याचा उद्देश होता. 2003 मध्ये त्यात सुधारणा करण्यात आली. त्यानंतर त्याला भारतीय वन्यजीव संरक्षण (सुधारणा) कायदा 2002 असे नाव देण्यात आले. यामध्ये दंड आणि दंडाची तरतूद अधिक कडक करण्यात आली आहे.

( हेही वाचा: आधार-पॅन लिंकसाठी पुन्हा मुदतवाढ, सीबीडीटीचा करदात्यांना दिलासा )

हे प्राणी पाळल्यास होणार शिक्षा

 • हरिण
 • माकड
 • अस्वल
 • चिकारा
 • बिबट्या
 • बबून
 • लांडगा
 • कोल्हा
 • डॉल्फिन
 • जंगली मांजर
 • रेनडियर
 • मोठी गिलहरी
 • पॅंगोलिन
 • गेंडा
 • बीव्हर
 • अस्वल
  हिमालयात आढळणाऱ्या अनेक प्राण्यांचा समावेश आहे.

भारतात कोणते प्राणी आणि पक्षी पाळले जाऊ शकतात?

कुत्रा, मांजर, गाय, म्हैस, शेळी, कबूतर (काही खास), मेंढी, ससा, कोंबडा, लहान मासे

भारतात ‘हे’ 15 प्राणी आणि पक्षी पाळण्यास बंदी आहे

 • पोपट
 • मोर
 • बदक (काही खास)
 • तीतर
 • घुबड
 • बहिरी ससाणा
 • उंट
 • माकड
 • हत्ती
 • हरिण
 • पांढरा उंदीर
 • साप
 • मगर
 • मगर
 • कासव

पोपट पाळणे, पिंजऱ्यात ठेवणे हाही गुन्हा आहे का?

वन्यजीवांच्या म्हणण्यानुसार, पोपट किंवा इतर कोणत्याही पक्षाला कैदेत ठेवणे आणि त्यातून कोणताही फायदा मिळवण्यासाठी त्याला प्रशिक्षण देणे हा कायदेशीर गुन्हा आहे.

- Advertisment -