शिवसेना कात टाकणार? उपनेतेपदी अर्जुन खोतकरांची नियुक्ती; दोघांची हकालपट्टी

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अर्जुन खोतकर यांची निवड करण्यात आली असून एका माहिती पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

Arjun Khotkar
अर्जुन खोतकर

शिवसेनेतील बंडखोर आमदारांनी वेगळा गट निर्माण केल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता वाढली आहे. अनेक कार्यकर्ते, नगरसेवक बंडखोर आमदारांसोबत गेल्याने शिवसेनेला खिंडार पडले आहे. त्यामुळे शिवसेनेने आता कात टाकत नव्याने उभे राहण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी बंडखोर आमदार, कार्यकर्ते, माजी नगरसेवकांना पक्षाच्या पदावरून हटवत त्याजागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात येत आहे. अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने अर्जुन खोतकर यांची निवड करण्यात आली असून एका माहिती पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली. दरम्यान, विजय नाहटा (Vijay Nahata) आणि विजय चौगुले (Vijay Chaugule) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचीही माहिती या पत्रकातून देण्यात आली आहे. (Arjun Khotkar elected as Shiv Sena Deputy Leader, Vijay Nahta Vijay Chowgule expelled from Shiv Sena)

हेही वाचा – शिंदे -फडणवीस यांची दिल्लीत अमित शहांसोबत मध्यरात्री खलबतं!

२१ जूनपासून राज्यात सत्तानाट्याचा खेळ सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या शिवसेनेतील ४० आमदार आहेत. तसेच, अनेक माजी नगरसेवकही शिंदे गटात सामिल झाल्याने शिवसेनेतील अनेक पदे रिकामी झाली आहेत. त्यामुळे या पदावंर आता नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच, युवानेता आदित्य ठाकर आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे. आदित्य ठाकरेंकडून निष्ठा यात्रा काढण्यात आली असून यामार्फत ते शिवसेनेला आणि पक्षातील कार्यकर्त्यांना बळकटी देणार आहेत.

हेही वाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज घेणार पंतप्रधान मोदींची भेट, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत होणार चर्चा?

दोघांची हकालपट्टी

अर्जुन खोतकर यांची उपनेतेपदी निवड केल्याने येणाऱ्या पालिकांच्या निवडणुकीत ते महत्त्वाच्या भूमिका बजावतील अशी आशा आहे. दरम्यान, विजय नाहटा आणि विजय चौगुले यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना पक्षातून बाहेर काढण्यात आले आहे.