Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र सरकारचा अधिकृत जीआर घेऊन अर्जुन खोतकर मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला, पण...

सरकारचा अधिकृत जीआर घेऊन अर्जुन खोतकर मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला, पण…

Subscribe

जालना : मराठा समाजावर झालेल्या लाठीमार प्रकरणी मागील काही दिवसांपासून राज्यात तणावाचं वातावरण आहे. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी माध्यमांशी बोलताना निजामकालीन नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखले देणार, तसेच सरकारकडून 5 सदस्यीय समिती स्थापन करण्यात आल्याची घोषणा केली होती. तसेच अंबड तालुक्यात मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणावर बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना उपोषण सोडण्याची विनंती केली होती. मात्र सरकारने ‘वंशावळ दस्तावेजा’ची अट रद्द करुन, सुधारीत अध्यादेश काढावा, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू ठेवले होते. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदेंच्या घोषणेनंतर सरकारचा अधिकृत जीआर घेऊन अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) आज उपोषणस्थळी पोहोचले. (Arjun Khotkar meets Manoj Jarange Patil with the official GR of the government but)

हेही वाचा – Manoj Jarange उपोषणावर ठाम, सुधारित GR काढण्याची अर्जुन खोतकरांकडे मागणी

- Advertisement -

अर्जुन खोतकर म्हणाले की, जरांगे पाटील यांच्याशी बोलल्याप्रमाणे शासनाच्या वतीने 3 गोष्टीसंदर्भात आश्वासन देण्यात आले होते. जीआर, गुन्हे मागे घेणे आणि दोषींवर कारवाई करणे या तिन्ही गोष्टी लेखी स्वरुपामध्ये घेऊन आलो आहे. पण आमच्यापेक्षा जरांगे पाटील यांची यंत्रणा चांगली दिसते. आम्ही जीआर आणण्याआधी त्यांनी जीआर सकाळी नाकारला.
मी आज सरकारच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना विनंती करण्यासाठी आलो आहे, त्यांनी जीआर जरी नाकारला असला तरी जरांग पाटील यांना काही सुधारणा सुचवायची असेल तर, त्यांनी स्वत: सह्याद्री अतिथीगृहावर किंवा वर्षा बंगल्यावर यावं. पण जरांगे पाटील यांना ते शक्य नसेल तर, त्यांनी 15-20 मंडळाचं शिष्टमंडळ नेमावं आणि मुंबईला पाठवावं. त्यांना मी सरकारसोबत चर्चेसाठी घेऊन जाईल.

मुख्यमंत्र्यासोबत होणाऱ्या बैठकीमध्ये जीआरमध्ये सूचना आणि दुरुस्ती करता येते का? याबाबत सर्व लीगल टीमला बसवून जरांग पाटलांचे सेक्रेटरी, मुख्य सचिव आणि सर्व मंत्र्यांना चर्चेत बसवू. मी 100 टक्के प्रयत्न करेल की, जीआरमध्ये दुरुस्ती होईल आणि समाजालाही याचा फायदा होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोनदा मनोज जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला आहे. याशिवाय दोन दिवसांत यासंदर्भात निर्णय होईल, असे आश्वासन अर्जन खोतकर यांनी दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मराठा आरक्षणाची हंडी फोडणारच; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्धार

जीआरमध्ये सुधारणा होत नाही तोपर्यंत…

दरम्यान, यावेळी बोलताना मनोज जरांग पाटील यांनी म्हटले की, आमचे शिष्टमंडळ मुंबईला जाऊन सरकारशी जीआरसंबंधित चर्चा करेल. जोपर्यंत सुधारणा केलेला जीआर येत नाही, तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. याशिवाय सरसकट मराठा समाजाला कुणबी आरक्षण द्यावे, ही आमची मागणी आहे. तसेच  वंशाववळ शब्द आहे तो काढून टाकावा, अशी मागणी मनोज जरांग पाटील यांनी केली आहे.

- Advertisment -