Homeक्रीडाArjuna Award : महाराष्ट्राच्या सचिन खिलारी, स्वप्नील कुसळेला अर्जुन पुरस्कार; ही आहेत...

Arjuna Award : महाराष्ट्राच्या सचिन खिलारी, स्वप्नील कुसळेला अर्जुन पुरस्कार; ही आहेत विजेत्यांची नावे

Subscribe

नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने खेलरत्न पुरस्कारासोबतच अर्जुन पुरस्काराचीदेखील नावे जाहीर करण्यात आली आहेत. यावेळी महाराष्ट्राचे 2 सुपुत्र सचिन खिलारी आणि स्वप्नील कुसळे यांना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यावेळी अर्जुन पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या एकूण 32 खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये 17 पॅरा ॲथलीट आहेत. विशेष म्हणजे यंदा क्रिकेटमध्ये कोणत्याही खेळाडूला पुरस्कार जाहीर झालेला नाही. (Arjuna Award declared by Sports Ministery 32 players complete list)

हेही वाचा : Khel Ratna Award : डी गुकेश, मनू भाकरला खेलरत्न जाहीर; 17 जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव

अर्जुन पुरस्काराची यादी क्रीडा मंत्रालयाकडून गुरुवारी (2 जानेवारी) जाहीर करण्यात आली. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळे याने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये 50 मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदक पटकावले होते. नेमबाजीत आलेल्या या पदकासाठी भारतीयांना तब्बल 12 वर्षे वाट पहावी लागली होती. तसेच, तो महाराष्ट्राच्या खाशाबा जाधव यांच्यानंतर वैयक्तिक ऑलिम्पिक पदक पटकावणारा दुसरा मराठमोळा खेळाडू ठरला होता. तसेच, पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र सचिन खिलारीने गोळाफेक प्रकारात रौप्य पदक मिळवले होते. गोळाफेक एफ 46 प्रकारात 16.32 मीटर लांब थ्रो फेकला होता. तसेच याचसोबत या प्रकारात इतका लांब थ्रो फेकणारा पहिला आशियाई खेळाडू ठरला होता.

अर्जुन पुरस्कारासाठी जाहीर नावे

– ज्योती येराजी (ऍथलेटिक्स)
– अन्नू राणी (ऍथलेटिक्स)
– नितू (बॉक्सिंग)
– सविती (बॉक्सिंग)
– वंतिका अग्रवाल (बुद्धिबळ)
– सलीमा टेटे (हॉकी)
– अभिषेक (हॉकी)
– संजय (हॉकी)
– जर्मनप्रीत सिंह (हॉकी)
– सुखजीत सिंह (हॉकी)
– राकेश कुमार (पॅरा-तिरंदाजी)
– प्रीती पाल (पॅरा-ॲथलेटिक्स)
– जीवनजी दीप्ती (पॅरा-ॲथलेटिक्स)
– अजित सिंह (पॅरा-ॲथलेटिक्स)
– सचिन सर्जेराव खिलारी (पॅरा-ॲथलेटिक्स)
– धरमबीर (पॅरा-ॲथलेटिक्स)
– प्रणव सूरमा (पॅरा-ॲथलेटिक्स)
– एच होकातो सेमा (पॅरा-ॲथलेटिक्स)
– सिमरन (पॅरा-ॲथलेटिक्स)
– नवदीप (पॅरा-ॲथलेटिक्स)
– नितेश कुमार (पॅरा-बॅडमिंटन)
– सुश्री तुलसीमाथी मुरुगेसन (पॅरा-बॅडमिंटन)
– नित्या श्री सुमथी सिवन (पॅरा-बॅडमिंटन)
– मनिषा रामदास (पॅरा-बॅडमिंटन)
– कपिल परमार (पॅरा-जुडो)
– मोना अग्रवाल (पॅरा-शूटिंग)
– सुश्री रुबिना फ्रान्सिस (पॅरा-शूटिंग)
– स्वप्नील सुरेश कुसळे (शूटिंग)
– सरबज्योत सिंह (शूटिंग)
– अभय सिंह (स्क्वॅश)
– साजन प्रकाश (स्विमिंग)
– अमन (कुस्ती)

अर्जुन पुरस्कार (आजीवन श्रेणी)

– सुचा सिंह (ऍथलेटिक्स)
– मुरलीकांत राजाराम पेटकर (पॅरा-स्विमिंग)

उत्कृष्ट प्रशिक्षकांसाठी द्रोणाचार्य पुरस्कार

– सुभाष राणा (पॅरा-शूटिंग)
– दीपाली देशपांडे (शूटिंग)
– संदीप सांगवान (हॉकी)

द्रोणाचार्य पुरस्कार (आजीवन श्रेणी)

– एस मुरलीधरन (बॅडमिंटन)
– अरमांडो अग्नेलो कोलाको (फुटबॉल)