नौशेरा दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्राचा सुपुत्र शहीद

मेजर शशीधर नायर हे पुण्याचे रहिवासी असून ते मुळचे केरळचे आहेत. दरम्यान, ते पुण्यातल्या खडकवासला येथे त्यांचे कुटुंबिय राहतात. त्यांच्या शहीद झाल्याची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबियावर शोककळा पसरली आहे.

army major shashidharan nair
शहीद मेजर शशीधरन व्ही नायर

जम्मू-काश्मीरच्या सीमा भागात दहशतवाद्यांच्या कुरापती सुरुच आहे. शुक्रवारी रात्री नौशेरा येते दहशतवाद्यांनी जवानांच्या टीमवर आयईडीचा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर शशीधरन व्ही नायर यांच्यासह एक जवान शहीद झाला. मेजर शशीधर नायर हे पुण्याचे रहिवासी असून ते मुळचे केरळचे आहेत. दरम्यान, ते पुण्यातल्या खडकवासला येथे त्यांचे कुटुंबिय राहतात. त्यांच्या शहीद झाल्याची बातमी कळताच त्यांच्या कुटुंबियावर शोककळा पसरली आहे. शशीधरन यांच्या पाश्चात त्यांची पत्नी तृप्ती असा परिवार आहे. मेजर शशीधरन हे ३३ वर्षाचे असून गेल्या ११ वर्षापासून ते देशसेवा करत होते. दरम्यान, शशिधरन यांचे पार्थिव आज पुण्यामध्ये येणार आहे.

जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरच्या लाम परिसरामध्ये दहशतवाद्यांनी जवानांवर आयईडी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये लष्कराच्या एका मेजरसह ५ जवान जखमी झाले. जखमी झालेल्या जवानांना उपचारासाठी लष्कराच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान मेजर शशिधरन नायर आणि एका जवानाचा मृत्यू झाला. तर इतर तीन जखमी जवानांवर उपचार सुरु आहेत. गेल्या २४ तासामध्ये दहशतवाद्यांकडून केला गेलेला हा दुसरा हल्ला होता. या घटनेनंतर सीमाऊागामध्ये अलर्ट देण्यात आला होता.

हेही वाचा – 

नौशेरामध्ये दहशतवादी हल्ल्यात मेजरसह एक जवान शहीद