घरमहाराष्ट्रनाशिकलष्करात बोगस भरती करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

लष्करात बोगस भरती करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

Subscribe

वय कमी दाखवून केलं जात होतं भरती, दोन संशयित ताब्यात

बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे मुलांचं वय कमी दाखवत लष्करात त्यांची भरती केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

अहमदनगर क्राइम ब्रँचने याप्रकरणी सहा जणांच्या मुसक्या आवळल्याहेत. त्यात नाशिक, बीड आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या रहिवाशांचा समावेश आहे. पाथर्डी पोलिसांच्या मदतीने गुप्तचर विभागाने दोन संशयितांकडून विविध शाळांचे दाखले, बनावट स्टॅम्प, कम्प्युटर, स्कॅनर, आधारकार्ड इ. साहित्य जप्त केलं. मारुती शिरसाठ, दत्तू गर्जे, पुंडलिक जायभाये, मच्छिंद्र कदम, अजय उर्फ जय टिळे, शांताराम अनार्थे अशी संशयितांची नावं आहेत.

- Advertisement -

देवळाली कॅम्प तोफखाना केंद्रातल्या लष्कर भरतीत बोगस प्रमाणपत्रांच्या आधारे मुलांना भरती केलं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार तोफखाना केंद्रातल्या गुप्तचर विभागाने अहमदनगर पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -