घरताज्या घडामोडीयामुळे अर्णब गोस्वामी यांची अलिबाग येथून तळोजा तुरुंगात रवानगी

यामुळे अर्णब गोस्वामी यांची अलिबाग येथून तळोजा तुरुंगात रवानगी

Subscribe

रायगड जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक झालेले रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथून आता तळोजा तुरुंगात हलवण्यात आले आहे. माहितीनुसार सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना तळोजा येथील तुरुंगात रवानगी केली आहे. आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास रायगड पोलीस अर्णब गोस्वामी यांना घेऊन तळोजाकडे निघाली. सुमारे साडेअकरा वाजण्याच्या सुमारास अर्णव गोस्वामी तळोजा येथे पोहचल्याची माहिती तळोजा जेल सूत्रांनी दिली. अर्णब गोस्वामींसह फिरोज शेख आणि नितेश सरजा यांची देखील तळोजा जेलला रवानगी करण्यात आली आहे.

गोस्वामींना तळोजा तुरुंगात नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या पोलीस गाडीला पूर्णपणे सर्व बाजूने झाकण्यात आली होती. न्यायालयीन कोठडी दिल्यानंतर गोस्वामी आणि त्यांच्यासोबतच्या अन्य दोघांना अलिबाग येथील मराठी शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. चार दिवस तेथे ठेवल्यानंतर गोस्वामी यांना रविवारी अलिबाग येथून हलविण्यात आले आहे. ४ नोव्हेंबर सकाळी वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून अर्णब गोस्वामींसह अन्य आरोपींना अलिबाग येथील पालिकेच्या शाळेतील क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. यादरम्यान अर्णब यांनी उच्च न्यायालय आणि सत्र न्यायालयात जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला. पण त्या प्रयत्नांना यश आले नाही.

- Advertisement -

दरम्यान अर्णब यांच्या तातडीच्या जामीन अर्जावर उद्या (९ नोव्हेंबरला) मुंबई उच्च न्यायालय निर्णय देणार आहे. त्यामुळे उद्या अर्णब यांना जामीन मिळणार की नाही हे कळणार आहे. जर उद्याही त्यांना जमीन मिळाला नाही तर त्यांना अजून काही दिवस तुरुंगात लागतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -