घरमहाराष्ट्रArogya Ratna Award : आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न...

Arogya Ratna Award : आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट कामासाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्काराची घोषणा, ‘यांचा’ होणार सन्मान

Subscribe

आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेला, उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन डॉक्टरांना, उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराला व 5 कर्मचाऱ्यांना बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.

मुंबई : आरोग्य क्षेत्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्यांसाठी बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी केली आहे. राज्य सरकारच्या वतीने हा पुरस्कार राज्यातील माता व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे, प्रजनन व बाल आरोग्य विषयी सेवा अधिक प्रभावीपणे देणे, कुटुंब कल्याण उपक्रमांची यशस्वीपणे अंमलबजावणी करणे आणि लोकसहभागातून विविध आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे. यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या पुरस्कार देण्यात येणार आहे.

राज्य सरकारने हा पुरस्कार 2023-24 या वर्षापासून एक नविन बाळासाहेब ठाकरे आरोग्य पुरस्कार सुरू केला आहे. याबाबतचा शासन निर्णयही निर्गमीत करण्यात आलेला आहे. आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेला, उत्कृष्ट काम करणाऱ्या तीन डॉक्टरांना, उत्कृष्ट वार्तांकन करणाऱ्या एका पत्रकाराला व 5 कर्मचाऱ्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी एक लाख रूपये असणार आहे. पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम दरवर्षी  बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी आयोजित करण्यात येईल.

- Advertisement -

हेही वाचा – Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा ‘या’ तारखेपासून पुन्हा आमरण उपोषणाचा इशारा, ‘हे’ आहे कारण

सन 2023-24 या वर्षात डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार प्राप्त व्यक्तीचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्य रत्न पुरस्कारासाठी विचार करण्यात येणार नाही, असे शासन निर्णयात नमूद आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -