घरठाणेलोकलमध्ये दिव्यांगाला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यास 24 तासांत अटक

लोकलमध्ये दिव्यांगाला जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यास 24 तासांत अटक

Subscribe

कल्याण लोकलच्या दिव्यांग डब्ब्यात शनिवारी (ता. २५ मार्च) रात्री दिव्यातील प्रमोद वाडेकर या दिव्यांग प्रवाशावर पेटता रूमाल फेकत, जळण्याचा प्रयत्न करणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन दिव्यांग बालकाला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात भिवंडीतून अटक केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

कल्याण लोकलच्या दिव्यांग डब्ब्यात शनिवारी (ता. 25 मार्च) रात्री दिव्यातील प्रमोद वाडेकर या दिव्यांग प्रवाशावर पेटता रूमाल फेकत, जळण्याचा प्रयत्न करणाऱ्या 16 वर्षीय अल्पवयीन दिव्यांग बालकाला ठाणे लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या चोवीस तासात भिवंडीतून अटक केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमध्ये दिव्यांगाच्या डब्ब्यात एका दिव्यांग व्यक्तीला जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली होती. दिव्यात राहणारे प्रमोद वाडेकर यांच्यासोबत मुंब्रा रेल्वे स्थानकात लोकल पोहोचल्यानंतर ही धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिसांनी तात्काळ कारवाई करत 24 तासांच्या आत 16 वर्षीय अल्पवयीन दिव्यांग बालकाला अटक केली आहे. भिवंडीतून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. सदर प्रकार त्याने नशेत प्रकार केला असून त्याला सोमवारी रेल्वे न्यायालयाने बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

- Advertisement -

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अटकेतील अल्पवयीन हा शनिवारी रात्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून कल्याणकडे जाणाऱ्या लोकलच्या दिव्यांग डब्ब्यात बसला होता. यावेळी डब्ब्यात बसून सोलूशनद्वारे रुमालावर टाकून त्याची तो नशा करत होता. ही लोकल मुंब्रा रेल्वे स्थानकात आल्यानंतर अचानक त्याने त्या रूमालाला आग लावली आणि तो रुमाल त्याने डब्ब्यात बसलेल्या प्रमोद वाडेकर यांच्या दिशेने फेकला. वाडेकर यांच्यावर रुमाल पडताच त्यांच्या शर्टाने पेट घेतला. ती आग विझवताना वाडेकर यांच्या दुसऱ्या हातालाही भाजले गेले. या घटनेनंतर लोहमार्ग पोलिसांनी त्यांच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर ठाणे लोहमार्ग पोलिसांनी तातडीने मिळालेल्या माहितीच्या आधारे पसार झालेल्या त्या अल्पवयीनचा शोध करत, रविवारी (ता. 27 मार्च) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घटनेच्या २४ तासांच्या आत आरोपीला अटक केली. हा आरोपी नशेच्या आहारी गेलेला असून त्या नशेच्या धुंदीत त्याने तो प्रकार केला असल्याची शक्यता आहे. अशी माहिती वरीष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांच्याकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – 29 आणि 30 एप्रिलला मुंबईतील हौसिंग सहकाराची मोठी परिषद, दरेकरांची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -