घरताज्या घडामोडीहिटलरशाहीवरून आजी-माजी संमेलनाध्यक्षांमध्ये मतभेद!

हिटलरशाहीवरून आजी-माजी संमेलनाध्यक्षांमध्ये मतभेद!

Subscribe

साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी देशातील सद्य परिस्थितीवर भाषणात मांडलेल्या भूमिकेवर माजी संमेलनाध्यक्ष अरुणा ढेरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

उस्मानाबादमध्ये यंदाचं मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. याआधीच संमेलनाचे अध्यक्ष फादर दिब्रेटो यांच्या निवडीवरून हे साहित्य संमेलन आधीच चर्चेत आणि पर्यायाने वादात आलं असतानाच आता यात आणखी एक वाद डोकं वर काढू पाहातो आहे. या वादामुळे देशातल्या सद्य परिस्थितीवर आजी-माजी संमेलनाध्यक्षांमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे. फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी संमेलनाध्यक्ष म्हणून केलेल्या भाषणावरून हा वाद सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता इतर साहित्यिकांमधून यावर काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

नक्की काय झाला वाद?

संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांनी केलेल्या भाषणामध्ये देशातील सद्य परिस्थितीवर भाष्य करण्यात आलं होतं. सध्याच्या परिस्थितीची थेट हिटलरशाहीशी तुलना करण्यात आली होती. ‘लोकशाहीच्या बुरख्याखाली एकाधिकारशाही नांदू शकते आणि आणीबाणी न लादता देखील लोकशाहीचा गळा घोटता येतो. हा लोकशाहीला फार मोठा घोका आहे. असं जेव्हा घडतं, तेव्हा देशातल्या स्वातंत्र्यप्रिय नागरिकांनी आणि साहित्यिक-विचारवंतांनी स्पष्ट भूमिका घ्यायला हवी’, असं फादर दिब्रेटो म्हणाले होते.

- Advertisement -

अरुणा ढेरेंनी नाकारली भूमिका

दरम्यान, याविषयी माजी संमेलनाध्यक्षा अरुणा ढेरे यांनी वेगळं मत प्रदर्शित केलं आहे. ‘एखाद्याने वेगळी भूमिका घेतली म्हणून त्याने त्या विचारधारेचा झेंडाच हाती घेतलाय असं होत नाही. देश कोणत्याही प्रकारे हिटलरशाहीच्या उंबरठ्यावर नाही. सगळे नागरिक सुजाण आहेत. आपण कशाला हिटलरशाहीच्या मागे जाणार?’ असं ढेरे म्हणाल्या. तसेच, ‘फादर दिब्रेटो यांनी भाषणात शेतकरी आत्महत्यांसारख्या समाजातल्या अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य केलं. त्यांची तळमळ खरी होती. देशात घडणाऱ्या गोष्टींचे पडसाद संमेलनात उमटलं स्वाभाविकच आहे. पण साहित्य संमेलनात साहित्यापेक्षा इतर मुद्द्यांवर जास्त बोललं गेलं’, असं देखील त्यांनी नमूद केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -