घरमहाराष्ट्रशिवसेनेची पुनर्बांधणी! अरविंद सावंत आणि भास्कर जाधव पक्षनेतेपदी, तर सचिवपदी पराग डाके

शिवसेनेची पुनर्बांधणी! अरविंद सावंत आणि भास्कर जाधव पक्षनेतेपदी, तर सचिवपदी पराग डाके

Subscribe

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

मुंबई – शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर पक्षात आता पनर्बांधणी सुरू झाली आहे. रिक्त असलेल्या कार्यकारिणीत अनेकांना स्थान देऊन त्यांच्यावरील जबाबदारी वाढवण्यात आली आहे. त्यानुसार, शिवसेनेसोबत निष्ठा राखणाऱ्या खासदार अरविंद सावंत आणि आमदार भास्कर जाधव यांना पक्षाच्या नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर, पराग डाके यांना सचिवपदी नियुक्त करण्यात आलं आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा – राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?, भास्कर जाधव स्पष्टच बोलले

- Advertisement -

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांना पक्षनेतेपद होतं. तसंच, त्यांच्यासोबत गेलेल्या अनेक आमदार आणि खासदारांना शिवेसनेने चांगल्या पदावर नियुक्त केलं होतं. मात्र बंडाळी झाल्यानंतर अनेक पदं रिकामे झाली. शिवसेनेतील ४० नेते आणि अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात गेल्याने कार्यकारिणीतील जागा रिक्त झाल्या. या जागांवर आता पक्षातील इतर कार्यकर्त्यांना संधी मिळत आहे. त्यानुसार, पक्षनेते पदी अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सचिवपदी पराग डाके यांना नियुक्त करण्यात आलंय.

हेही वाचा – ‘मविआ’नेच शेतकऱ्याचे भले केले, तुम्ही नाही करू शकत; भास्कर जाधवांचा शिंदे गटाला टोला

- Advertisement -

आक्रमक स्वभाव म्हणून ओळखले जाणारे भास्कर जाधव गेल्या काही दिवसांपासून प्रचंड सक्रीय आहेत. शिंदे गटाविरोधात त्यांनी रान उठवले आहे. विधानसभेतही त्यांनी शिवसेनेची बाजू लावून धरली होती. तर, अरविंद सावंत यांनीही संसदेत सत्ताधाऱ्यांविरोधात हल्लाबोल केला आहे. त्यामुळे शिवसेनेने या दोन्ही नेत्यांना बढती दिली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -