घर देश-विदेश INDIA Alliance : "आमच्यात कोणतेही मतभेद नाही, पण...," अरविंद केजरीवालांचे स्पष्ट मत

INDIA Alliance : “आमच्यात कोणतेही मतभेद नाही, पण…,” अरविंद केजरीवालांचे स्पष्ट मत

Subscribe

INDIA आघाडीच्या बैठकीनंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर आणि मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारवर निशाणा साधत इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.

मुंबई : विरोधकांची आघाडी असलेल्या INDIA ची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली आहे. या बैठकीमध्ये आगामी काळाच्या दृष्टीने काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची स्थापना करण्यात आली आहे. यात 28पैकी 14 पक्षांचा यात समावेश आहे. या समितीसाठी महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांचा निवड करण्यात आली आहे. या बैठकीनंतर इंडिया आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांवर आणि मोदी सरकारवर निशाणा साधण्यात आला. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजप सरकारवर निशाणा साधत इंडिया आघाडीतील नेत्यांमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. (Arvind Kejriwal informed that there is no difference in the India Alliance)

हेही वाचा – “कोरोना काळात, मणिपूर जळत असताना विशेष अधिवेशन बोलावले नाही आणि आता…”, खर्गेंची मोदींवर टीका

- Advertisement -

यावेळी बोलताना केजरीवाल म्हणाले की, इंडिया आघाडी ही काही 26 किंवा 27 पक्षांची आघाडी नाही. तर ही आघाडी देशातील 140 करोड लोकांसाठी बनलेली आघाडी आहे. या आघाडीमध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत. ते 21 व्या दशकाच्या निर्मितीसाठी एकत्र होत आहेत. आज मला खूप दुःख होते की, देशात जे मोदी सरकार आहे ते स्वतंत्र भारतातील आजवरचे सर्वाधिक भ्रष्ट सरकार आणि अहंकारी सरकार आहे. मागील तीन-चार दिवसांपासून विदेशातील वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर बातम्या छापून येत आहेत की, आपले भारतातील सरकार हे केवळ एका व्यक्तीसाठी काम करते. तो एक व्यक्ती भारतातील पैसे गोळा करून विदेशात जात आहे आणि त्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मदत करण्यात येत आहे, असे केजरीवाल यांच्याकडून सांगण्यात आले.

आज आपल्या भारतातील तरुण रोजगार शोधत आहे. उच्च शिक्षण घेऊन सुद्धा तरुण पिढी बेरोजगार आहे. त्यामुळे रोजगारासाठी तरुणाई जेव्हा सरकारकडे जाते, तेव्हा कळते की संपूर्ण सरकार ही केवळ एका व्यक्तीसाठी काम करत आहे. संपूर्ण सरकार हे भ्रष्टाचारामध्ये बुडालेले आहे. आज लोकांकडे खर्च करण्यासाठी तितके पैसे नाहीत. तितका पगार त्यांना मिळत नाहीये. यापेक्षा अहंकारी सरकार कधीच सत्तेत आले नव्हते. हे स्वतःला देवापेक्षा श्रेष्ठ समजायला लागले आहेत. त्यामुळे यांचा नाश आम्हीच करणार, असा विश्वास अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

यावेळी त्यांनी इंडिया आघाडीतील मतभेदावर देखील आपले स्पष्ट मत व्यक्त केले. आमची इंडिया आघाडी येणाऱ्या काळात मोदी सरकारच्या नाशाचे कारण ठरणार आहे. ज्यामुळे अनेकांकडून ही आघाडी तोडण्याचे काम करण्यात येईल. मागील काही दिवसांपासून मुद्दामहून आमच्यात वाद असल्याचे सांगण्यात येत आहे. पण मी विश्वासाने सांगू इच्छितो की, मी मागील तीन बैठकांमध्ये सहभागी झालेलो आहे. जितक्या प्रेमाने आणि आदराने या बैठका झालेल्या आहेत, कोणाचाही कोणाशी वाद झालेला नाही. या आघाडीत सहभागी झालेला एकही व्यक्ती पदाकरिता सहभागी झालेला नाही. सगळे ह140 कोटी जनतेला वाचविण्यासाठी इंडिया आघाडीमध्ये सहभागी झालेले आहेत. या दोन दिवसाच्या बैठकीत प्रत्येकाने पुढाकार घेऊन जबाबदारी वाटून घेतल्याची माहिती अरविंद केजरीवाल यांच्याकडून देण्यात आली.

- Advertisment -