घरमहाराष्ट्रईडी हे भाजपचं उपकार्यालय; अडसूळ यांच्यावरील कारवाईनंतर अरविंद सावंत यांचा हल्लाबोल

ईडी हे भाजपचं उपकार्यालय; अडसूळ यांच्यावरील कारवाईनंतर अरविंद सावंत यांचा हल्लाबोल

Subscribe

शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावरील ईडी कारवाईवरुन शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ईडी हे भाजपचं उपकार्यालय आहे, असा घणाघात अरविंद सावंत यांनी केला. तसंच, यंत्रणांचा राजकीय वापर सुरु आहे, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

सिटी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर ईडीने कारवाई केली. ईडीच्या कारवाई दरम्यान अडसूळ यांची तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. ईडीचा राजकीय वापर करण्यात येत असून ईडी हे भाजपचं उपकार्यालय आहे, असं टीकास्त्र अरविंद सावंत यांनी सोडलं. रवी राणा यांच्यावर आरोप आहेत. रवी राणा यांनी बीएसएनएलची जमीन हडप केली आहे. नवनीत राणा या सुप्रीम कोर्टात केस पराभूत होत आल्यात त्यामुळे ही कारवाई करण्यात येत आहेत, असा आरोप अरविंद सावंत यांनी केला.

- Advertisement -

याशिवाय, शिवसेनेला बदनाम करण्याचं कारस्थान असल्याचा आरोप अरविंद सावंत यांनी केला. सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या खातेदारांना न्याय मिळालाच पाहिजे. पण सिटी को-ऑपरेटिव्ह बँकेसोबत इतर बँकांचं बोला, असं अरविंद सावंत म्हणाले. पुढे त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या ईडी चौकशीवर भाष्य केलं. अनिल परब हे ईडीच्या चौकशीला सामोरं जातील त्यांच्यात ती क्षमता आहे. बिहार, उत्तर प्रदेश या राज्यात देशातील भ्रष्टाचाराचा कळस आहे तिथं त्यांची सत्ता आहे त्यामुळं तिथं कारवाई होत नाही, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत. तसंच मुख्यमंत्र्यांना त्रास देण्याचा जरी प्रयत्न असला तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे समर्थ आहेत, असं अरविंद सावंत म्हणाले.

अडसूळ यांची तब्येत बिघडली

ईडीच्या चौकशीवेळी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांची तब्येत बिघडली असून त्यांना गोरेगाव येथील लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या रुग्णालयाच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील शिवसैनिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. थोड्या वेळापूर्वीच रुग्णालयामध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांचं एक पथक देखील दाखल झालेलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ईडीच्या चौकशीवेळी शिवसेना नेते अडसूळ यांची तब्येत बिघडली

सिटी बँक कथित घोटाळ्याप्रकरणी सेनेचे माजी खासदार अडसूळ यांच्यासह मुलाला ईडीचं समन्स


 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -