घरताज्या घडामोडीकाळे फासणारे तुमच्यासोबत, तुम्ही गप्प का?, अरविंद सावंतांचा गडकरींना सवाल

काळे फासणारे तुमच्यासोबत, तुम्ही गप्प का?, अरविंद सावंतांचा गडकरींना सवाल

Subscribe

जणू काही शिवसेना संपुर्ण महाराष्ट्रात रस्ते बांधणीच्या कामाला विरोध करत आहे असा सूर त्या पत्रात उमटत आहे.

राष्ट्रीय महामार्गाच्या कामांमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून अडथळे आणण्यात येत असल्याची तक्रार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पत्र लिहिले आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडथळे येत आहेत. हस्तक्षेप करुन काम सुरु करण्यासाठी कारवाई करावी अशी विनंती गडकरींनी केली आहे. यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली आहे. मुंबई-गोवा महामार्ग आम्ही करतोय का? काळे फासणारे, दशत निर्माण करणारे तुमच्या सोबत आहेत. तिथे तुम्ही गप्प का बसला असा सवाल नितीन गडकरी यांना करण्यात आला आहे.

शिवसेना खासदार अरविंद सांवत यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. नितीन गडकरींनी केलेल्या आरोपांवर अरविंद सांवत यांनी जोरदार टीका केली आहे. नितीन गडकरी यांचा पूर्ण आदर आहे. शिवसेना शब्द वापरण्याऐवजी त्यांनी एका विशिष्ट भागाचा उल्लेख केला असता तर बर झालं असतं. त्यांनी महाराष्ट्राचा उल्लेख केला आह. जणू काही शिवसेना संपुर्ण महाराष्ट्रात रस्ते बांधणीच्या कामाला विरोध करत आहे असा सूर त्या पत्रात उमटत आहे. हे गैर आहे असे अरविंद सांवत यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या प्रकरणाची नोंद घेऊन चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीदरम्यान खरे शिवसैनिक आहेत की, आमच्या नावाने कोणी बोंबा मारत आहेत. ते समजेल, मात्र जिथे जिथे महाराष्ट्रात विरोध होत आहे तिथली नोंद त्यांनी करणं आवश्यक आहे. तुम्ही शिवसेना का म्हणताय? मुंबई गोवा रोड आम्ही करतो आहे का? काळे फासणारे, दहशत निर्माण करणारे, उठाबशा काढायला लावणारे, चिखलफेक करणारी माणसे आज तुमच्याबरोबर आहेत. तिथे तुम्ही गप्प का? असा सवाल अरविंद सावंत यांनी केला आहे.

गडकरी काय म्हणाले

केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी बरेच प्रकल्प पूर्णत्वास आलेले असून काही प्रगतीपथावर आहेत. मात्र अनेक प्रकल्पांच्या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचे माझ्या निदर्शनास आलेले आहे. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भंडावून सोडणे व त्यांनी न ऐकल्यास कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत या लोकप्रतिनिधींची मजल गेली आहे. विशेषत: विशेषतः वाशिम जिल्ह्यात हे प्रामुख्याने घडते अहे. असे नितीन गडकरी यांनी पत्रात म्हटलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -