Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी शिवसैनिकाला डावलून मुख्यमंत्री संभाजीराजेंना जागा देत होते पण..., अरविंद सावंतांनी सांगितलं 'कारण'

शिवसैनिकाला डावलून मुख्यमंत्री संभाजीराजेंना जागा देत होते पण…, अरविंद सावंतांनी सांगितलं ‘कारण’

Subscribe

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आणि मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असल्यापासून भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी नवीन नवीन मुहूर्त काढला जात आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे छत्रपती यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली होती. परंतु राजेंनी नकार दिला आहे. तसेच शिवसेना पुरस्कृत उमेदवारी देण्याबाबत शब्द दिला होता. परंतु त्यांनी शब्द पाळला नाही असा आरोप संभाजीराजे छत्रपती यांनी केला आहे. या आरोपावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकाला डावलून संभाजीराजेंना उमेदवारी देण्याचे आश्वासन दिलं होते. परंतु त्यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी भूमिका होती असे अरविंद सावंत म्हणाले आहेत.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद सावंत म्हणाले की, शिवसेना शब्दाला जागणारा एकमेव असा देशातील पक्ष आहे. शिवसैनिकांवर आणि आमच्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार आहेत. राज्यसभेत आणि लोकसभेत संख्येला महत्त्व आहे. त्यामुळे आमच्या अधिकृत उमेदवारालाच राज्यसभेवर जायला पाहिजे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जड अंतःकरणाने शिवसैनिकाला डावलून संभाजी राजेंना जागा द्यायला तयार होते परंतु राजेंनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी इच्छा होती. राजेंना बंधन नको होते. त्यांना अपक्ष लढायचे होते असे अरविंद सावंत म्हणाले आहेत.

- Advertisement -

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून आणि मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असल्यापासून भाजपकडून महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी नवीन नवीन मुहूर्त काढला जात आहे. हा सगळा गदारोळ महाराष्ट्र बघतो आहे, सरकार पडत नाही म्हणून असे प्रकार सुरू आहेत. एवढ्या खालच्या पातळीचे राजकारण मी कधी पाहिले नव्हते अशा शब्दात अरविंद सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही

संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही असे संभाजीराजे म्हणाले आहेत. शिवसेना पुरस्कृत उमेदवार करता येईल असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता असे संभाजीराजेंनी सांगितले. परंतु शिवसैनिकाला उमेदवारी दिली आहे. संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली असून हा स्वाभिमान असल्याचे संभाजीराजे म्हणाले.


- Advertisement -

हेही वाचा : मी बाळासाहेबांना शब्द दिला म्हणणारे उद्धव ठाकरेच शब्द मोडतात तेव्हा…, संभाजीराजेंचा घणाघात

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -