Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी देर आये दुरुस्त आये..; राज्यपालांच्या राजीनाम्यावर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया

देर आये दुरुस्त आये..; राज्यपालांच्या राजीनाम्यावर अरविंद सावंतांची प्रतिक्रिया

Subscribe

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज दिली. या संदर्भात राजभवनाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकातून राज्यपाल कोश्यारी यांनी ही माहिती दिली. दरम्यान, राज्यपालांच्या राजीनाम्यावर ठाकरे गटाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देर आये दुरुस्त आये! राज्यपालांनी घटनाबाह्य ज्या गोष्टी केल्या आहेत, त्याचं पापक्षालन राजीनाम्याने होणारं नाही. मात्र, हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे, असं अरविंद सावंत म्हणाले.

- Advertisement -

राज्यपालांनी अनेक घटनाबाह्य गोष्टी केल्या आहेत. त्यांनी ज्या मुख्यमंत्र्यांना शपथ दिली, ती कोणाच्या शिफारसीवरून दिली. हे आजपर्यंत महाराष्ट्राला कळलेलं नाही. मुळात अशा परिस्थितीत सर्वाधिक संख्या असलेल्या पक्षाला सत्तास्थापन करण्यासाठी बोलावलं जातं. त्यानंतर राजकीय पक्ष बैठक घेऊन नेता निवडतात, असं अरविंद सावंत म्हणाले.

राज्यपालांनी नेमकं काय म्हटलंय?

- Advertisement -

महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीरांच्या महान भूमीचा राज्यसेवक, राज्यपाल होण्याचा बहुमान मिळणे हे माझ्याकरिता अहोभाग्य होते. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळ राज्यातील जनसामान्यांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी कधीही विसरता येणार नाही. माननीय पंतप्रधानांच्या नुकत्याच झालेल्या मुंबई दौऱ्यात आपण राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. माननीय पंतप्रधानांचा विशेष स्नेह आपणास नेहमीच लाभत आला आहे, आणि आशा आहे की या संदर्भात देखील मला त्यांचा आशिर्वाद मिळत राहील, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या मनोगतामध्ये म्हटले असल्याचे राजभवनाने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.


हेही वाचा : मोठी बातमी! राज्यपालपदाचा राजीनामा द्यायचा आहे, कोश्यारींनी पंतप्रधानांना सांगितली ‘मन की बात’


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -