Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंगप्रमाणे यांना सत्तेत येण्याची घाई, अरविंद सावंतांची भाजपवर खोचक...

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंगप्रमाणे यांना सत्तेत येण्याची घाई, अरविंद सावंतांची भाजपवर खोचक टीका

आमच्या कुबड्या आणि शिडी वापरुन भाजप महाराष्ट्रात आला

Related Story

- Advertisement -

सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक अदर पुनावाला यांनी धमकी आल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यानंतर राज्यातील राजकीय चर्चांमध्ये उधाण आले आहे. राजकीय वर्तुळात आरोपांच्या फैरी झडल्या आहेत. शिवसेनेचे खासदार यांनी आम्हाला अदर पुनावाला यांच्याबद्दल प्रचंड आदर आहे. ते माणसाचा जीव वाचवत आहेत आणि महाराष्ट्रातील जनतेचा जीव वाचवत आहेत. शिवसेना आक्रमक भुमिका घेत असली तरी आम्ही अशी भाषा वापरत नाही असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. तसेच यावरुन भाजपला चांगलेच फटकारत उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंगप्रमाणे यांना सत्तेत येण्याची घाई लागली असल्याचा टोलाही लगावला आहे.

सीरमचे संस्थापक अदर पुनावाला यांना आलेल्या धमकी प्रकरणात शिवसेनेचे नाव काही नेते घेत आहेत. यावरुन खासदार अरविंद सावंत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. अदर पुनावाला यांना धमक्या देऊन लोकांचा जीव कसा वाचवणार ? केवळ शिवसेनेची बदनामी करण्यासाठी आरोप करण्यात येत आहेत? शिवसेनेने कोणतीही धमकी दिली नाही आहे. भाजपला पश्चिम बंगालमधील जनतेने धडा शिकवला आहे. त्यापुर्वी महाराष्ट्राने शिकवला आहे. उतावळा नवरा आणि गुडघ्याला बाशिंग या उक्तीप्रमाणे यांना सत्तेवर येण्याची घाई लागलीयं असा टोला खासगार अरिवंद सावंत यांनी लगावला आहे.

- Advertisement -

शिवसेना आमच्या कुबड्यांवर होती असे भाजप आमदार आशिष शेलार यांनी म्हटले होते. यालाही सावंतांनी चांगलेच प्रत्युत्तर दिले आहे. आमच्या कुबड्या आणि शिडी वापरुन भाजप महाराष्ट्रात आला आहे. भाजप आमच्या कुबड्यांवर होता. बाळासाहेब ठाकरे यांचे अशिर्वाद नसते तर भाजप दुर्बिणीने शोधूनही महाराष्ट्रात सापडला नसता अशी टीका खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे. ज्यांना बेळगावचा इतिहास माहित नाही असा पोरकट लोकांनी आपले ज्ञान पाजळू नये असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी लगावला आहे.

- Advertisement -