घरमहाराष्ट्रAryan Khan Bail Hearing: आर्यनची आजची रात्र तुरुंगात; जामीनावर उद्या सुनावणी

Aryan Khan Bail Hearing: आर्यनची आजची रात्र तुरुंगात; जामीनावर उद्या सुनावणी

Subscribe

आर्यन खानची आजची रात्र तुरुंगात जाणार आहे. कारण आर्यनच्या जामीनावर उद्या सुनावणी होणार आहे. न्यायालयाचं आजचं काम संपलं असून उद्या पुन्हा आर्यनच्या जामीनावर सुनावणी होणार आहे.

- Advertisement -

आर्यनच्या बाजूने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ मुकूल रोहतगी यांनी युक्तीवाद केला तो पूर्ण झाला. त्यानंतर मूनमून धमेचा जी आर्यन खानसोबत सहआरोपी आहे तिच्यावतिने ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अमित देसाई यांनी युक्तीवाद केला. परंतु, न्यायालयाचा कामकाजाचा वेळ आधिच संपला होता. त्यामुळे जवळपास ६ वाजता न्यायालयानं आजचं कामकाज संपवत ्सल्याचं जाहीर करत उद्या पुन्हा सुनावणी घेणार असल्याचं सांगितलं. उद्या मूनमून धमेचा आणि अरबाज मर्चंट यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. त्यानंतर एनसीबी युक्तीवाद करणार आहे. एनसीबीच्यावतिने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग हे युक्तीवाद करतील.

क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असेलल्या आर्यन खानने मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जावर आज सुनावणी झाली. यावेळी आर्यन खानची बाजू ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी मांडली. न्यायालयाने रोहतगी तसंच एनसीबीच्या वकिलांची बाजू ऐकूण घेतली आहे. आज कोर्टात फक्त युक्तीवाद झाला आहे. त्यामुळे आजची सुनावणी स्थगित करण्यात आली. तसंच उद्या म्हणजेच २७ ऑक्टोबर रोजी पुन्हा एकदा आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल. त्यामुळे उद्या न्यायालयात नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -