घरताज्या घडामोडीAryan Khan case : मला झोपेचा विकार असल्यानेच गांजा घेत होतो, आर्यनची...

Aryan Khan case : मला झोपेचा विकार असल्यानेच गांजा घेत होतो, आर्यनची कबुली

Subscribe

एनसीबीच्या चौकशीदरम्यान आर्यन खानचा डीलर्सशी संपर्क झाला असल्याची माहिती समोर आली होती. आर्यन खानने स्वतः याबाबत कबुली देताना आपण डीलर्सला ओळखत असल्याचे सांगितले होते.

हिंदी सिनेसृष्टीत यशाच्या शिखरावर पोहोचलेला अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आपला मुलगा आर्यन खानच्या ड्रग्ज (aryan khan case) प्रकरणामुळे चर्चेत होता. कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या छापेमारीमध्ये एनसीबीने ड्रग्जपार्टी संबधित आर्यन खानसह अनेक जणांना अटक केली होती. आर्यन खानला महिनाभर जेलमध्ये राहावे लागले होते. पंरतु शुक्रवारी एनसीबीने (NCB) कोर्टात आरोपपत्र दाखल केले. ज्यामध्ये आर्यन खान दोषी नसल्याचे समोर आलं आहे. आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नसल्याचे एनसीबीने आरपपत्रात म्हटलं आहे. मात्र 23 वर्षीय आर्यन खानने चौकशीदरम्यान गांजा सेवन केले असल्याचे कबूल केलं आहे. परदेशात शिक्षण घेत असताना गांजा सेवन केल्याचा खुलासा आर्यनकडून करण्यात आला आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज पार्टी प्रकरणी मुंबई एनसीबीने अटक केली होती. यावेळी त्याची चौकशी करण्यात आली होती. चौकशीमध्ये आर्यन खानने 2018 रोजी यूएसमध्ये शिक्षण घेत असताना गांजाचे सेवन केल्याचे सांगितले. झोपेचा विकार असल्यामुळे गांजाच्या संपर्कात आलो असे आर्यनने सांगितले आहे. झोपेच्या विकाराबाबत इंटरनेटवर माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी समजले की, गांजामुळे झोपेच्या विकारासंबंधी आजार बरा होता. यामुळे गांजाचे सेवन केले अशी कबुली आर्यनने चौकशीदरम्यान दिली होती.

- Advertisement -

आर्यन खानसोबत कॉर्डेलिया क्रूझवर एनसीबीने ६ आणखी लोकांना अटक केली होती. आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाही यामुळे त्याचा चार्जशीटमध्ये उल्लेख नाही असे एनसीबीकडून कोर्टात सांगण्यात आले आहे. मात्र अरबाझ मर्चंटकडे ड्रग्ज सापडले होते. एनसीबी डीजी एसएन प्रधान यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान पहिल्या टीमने निष्काळजीपणा केला आहे. त्यांनी वैद्यकीय तपासणी केली नाही तसेच व्हिडीओ रेकॉर्डिंगसुद्धा केली नाही.

आर्यनचे डीलर्सशी संबंध

एनसीबीच्या चौकशीदरम्यान आर्यन खानचा डीलर्सशी संपर्क झाला असल्याची माहिती समोर आली होती. आर्यन खानने स्वतः याबाबत कबुली देताना आपण डीलर्सला ओळखत असल्याचे सांगितले होते. तसेच तो डीलर्स मित्र आचितच्या ओळखीचा आहे. एनसीबीने आचितला सहआरोपी दाखवलं आहेत. परंतु आर्यनला क्लीनचिट देताना एनसीबीने असे म्हटलं आहे की, आर्यनकडे कोणतेही ड्रग्ज सापडले नाही. तसेच असे कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही ज्याने आर्यन ड्रग्ज पार्टीच्या आयोजनाचा भाग असल्याचे सिद्ध होईल.

- Advertisement -

हेही वाचा : सुप्रिया सुळेंना घरी जा, स्वयंपाक करा म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटलांचा माफिनामा, पत्रातून दिलगिरी व्यक्त

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -