Cruise Drugs Case: नूपूरने क्रूझवर सॅनिटरी पॅडमध्ये लपवून आणले ड्रग्ज, आर्यनसह झाली अटक

aryan khan cruise drugs case ncb accused arbaaz merchantt munmun dhamecha Nnupur sarika arrives on a cruise hiding drugs in a sanitary pad
Cruise Drugs Case: नूपूरने क्रूझवर सॅनिटरी पॅडमध्ये लपवून आणले ड्रग्ज, आर्यनसोबतची संशयित आरोपी

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका अलिशान क्रूझवरील ड्रग्ज पार्टीवर एनसीबीने धाड टाकली. या पार्टीमधून अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह ८ जणांना अटक एनसीबीने बेड्या ठोकल्या. या आरोपींमध्ये पेशाने शिक्षिका असलेली नुपूर सारीका हिचा देखील समावेश आहे. दिल्लीतील एका लहान मुलांच्या शाळेत ती शिक्षिका म्हणून काम करत असल्याची माहिती मिळाली आहे.

नुपूर हिने क्रूझवर सॅनिटरी पॅडमध्ये लपवून अमली पदार्थ आणले होते अशी माहिती समोर आली आहे. तिला हे अमली पदार्थ मोहक जसवालने दिले होते. मोहक हा देखील दिल्लीतील रहिवासी असून तो पेशाने एक आयटी क्षेत्रात काम करणारा आहे. विदेशात कामाचा अनुभव असलेला मोहक मुंबईतून एक ड्रग्जविक्रेत्याकडून अमली पदार्थ विकत घेत होता. हे विकत घेतलेले अमली पदार्थ त्याने नुपूरला दिले होते. मात्र चेकिंगच्या भीतीने हे अमली पदार्थ त्याने नुपूरला सॅनिटरी पॅडमध्ये लपवून क्रूझवर नेण्याचा सल्ला दिला होता.

सध्या आर्यनसह एकूण १६ जणांविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्य़ांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी याप्रकरणातील आरोपी आर्यन खानसह आठ जणांना ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली. त्यानंतर आज दिवसभरात एकूण आठ जणांचा अटक करण्यात आली आहे. यापैकी चार जणांचा आज कोर्टात हजर करून ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत रवानगी केली असून उर्वरित चार जणांना उद्या कोर्टात हजर केले जाणार आहे.