घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआलिशान कार, पर्यटन सहलींसह क्रिप्टो कॉइन असे सांगून तब्बल साडेचार कोटींना गंडवले

आलिशान कार, पर्यटन सहलींसह क्रिप्टो कॉइन असे सांगून तब्बल साडेचार कोटींना गंडवले

Subscribe

नाशिक : आलिशान कार, पर्यटन सहलींसह क्रिप्टो कॉइनचे आमिष दाखवून कर्नाटकमधील दोन युवकांनी नाशिकमधील अनेक गुंतवणूकदारांना फसविल्याचे समोर आले आहे. दोन जणांनी एम फॉरेक्स आणि कॉर्बेट क्रिप्टो कॉइन ५५ च्या नावावर शहरातील २३ तक्रारदारांच्या बँक खात्यांतून आणि रोख स्वरूपात तब्बल चार कोटी १८ लाख ५३ हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
मोहम्मद हबीब मोहम्मद हनीफ (रा. गुलबर्गा, कर्नाटक) आणि मोहम्मद अब्बास मोहम्मद युसूफ अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व युवराज रूस्तम गायकवाड उर्फ युवराज पाटील (रा. पवननगर, सिडको) यांच्या तक्रारीनुसार,दोन संशयितांनी तक्रारदार आणि त्याच्या मित्रांचा विश्वास संपादन केला. त्र्यंबक रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये जानेवारी २०२१ मध्ये बैठक घेतली. नागरिकांना गुंतवणूक योजनेची माहिती दिली होती. सहा महिन्यांत गुंतवणुकीवर दुप्पट परतावा मिळेल. गुंतवणूकदारांना वेगवेगळे पारितोषिक मिळतील. इतकेच नव्हे, तर अलिशान मोटार व परदेशात यात्रेची संधी दिली जाईल. त्यास अनेक जण बळी पडले. अनेकांनी पाच ते २० लाखांपर्यंतची रक्कम या योजनांमध्ये गुंतवली. संशयितांचे एम फॉरेक्स व क्रिप्टो करन्सीच्या नावाने वेबपोर्टल होते. त्यावर गुंतवणूक व तत्सम माहिती दिली जात असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, संशयितांनी कॉर्बेट क्रिप्टो कॉइन ५५ आणि ऑनलाइन आर्थिक व्यवहारांसाठी अ‍ॅपही विकसित केले.

- Advertisement -

एम फॉरेक्स व कॉर्बेट क्रिप्टो कॉइनच्या नावा गुंतवणूकदारांच्या बँक खात्यांमधून आणि रोख स्वरूपात चार कोटी १८ हजारहून अधिक रक्कम घेण्यात आली. मुदत संपुष्टात आल्यानंतरही गुंतवणूकदारांना परतावा मिळाला नाही. संशयितांचा सपर्क तुटल्याने, वेब पोर्टल आणि आर्थिक व्यवहाराचे अ‍ॅपही बंद झाल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -